रस्ता
भेटल्यावर तोंडभर जे हासले
तेच फिरता पाठ मागे बोलले
मी कधी पडलो न येथे एकटा
सोबतीला एकटेपण थांबले
तू कशाला हाक निघताना दिली
जायचे माझे अशाने लांबले
आठवांचे काय मी आता करू ?
कोपरे सारे मनाचे संपले
शब्द हे वेळी अवेळी भेटती
लोक म्हणती वेड ह्याला लागले
सांग तू कविते मला हे एकदा
चार शब्दांनी कुणाचे भागले?
मी जसा आहे तसा आहे सुखी
येव्हढे पण सुख कुणाला लाभले?
हा मला रस्ता मिळाला शेवटी
चाललो मी लोक मागे चालले
शेवटी तो माणसागत वागला
शेवटी उपकार त्याने मोजले!
अनिरुद्ध अभ्यंकर
गझल:
प्रतिसाद
पुलस्ति
मंगळ, 29/04/2008 - 06:39
Permalink
वाहवा!
चार शब्द - मस्तच शेर!
मी जसा आहे तसा आहे सुखी
येव्हढे पण सुख कुणाला लाभले? - अतिशय सहज...
शब्द हे वेळी अवेळी भेटती
लोक म्हणती वेड ह्याला लागले - हा शेर तर फार फार आवडला अनिरुद्धराव!!
प्रदीप कुलकर्णी
बुध, 30/04/2008 - 21:47
Permalink
सुंदर...
सुंदर...
सगळे शेर आवडले, अनिरुद्ध.
शेवटी तो माणसागत वागला
शेवटी उपकार त्याने मोजले!
अप्रतिम. शुभेच्छा.
अनंत ढवळे
शनि, 03/05/2008 - 13:38
Permalink
सुंदर
मी कधी पडलो न येथे एकटा
सोबतीला एकटेपण थांबले
शब्द हे वेळी अवेळी भेटती
लोक म्हणती वेड ह्याला लागले
चांगले शेर !
चित्तरंजन भट
रवि, 04/05/2008 - 21:11
Permalink
लोक म्हणती वेड ह्याला लागले
शब्द हे वेळी अवेळी भेटती
लोक म्हणती वेड ह्याला लागले
वाव्वा...गझल, विशेषतःही गझलेतली सहजता, फार आवडली.
समीर चव्हाण (not verified)
मंगळ, 05/08/2008 - 15:26
Permalink
व्वा
चित्तरंजनशी सहमत...
गझलेतली सहजता, फार आवडली
अनिरुद्ध अभ्यंकर
बुध, 10/09/2008 - 13:47
Permalink
धन्यवाद!!
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी)अनिरुद्ध अभ्यंकर
भूषण कटककर
बुध, 10/09/2008 - 14:41
Permalink
मी कधी
मी कधी पडलो न येथे एकटा
सोबतीला एकटेपण थांबले
या शेरावरून भट साहेबांचा एक शेर आठवला. त्याचा अर्थ काहीसा असा होता. मला एकटे कधी वाटलेच नाही कारण दु:ख माझ्या साथीला होतेच असा काहीसा. पण हाही शेर छान आहे.
हा सर्वोत्तम शेर!
सांग तू कविते मला हे एकदा
चार शब्दांनी कुणाचे भागले?