काळीज


'हो! हो!' म्हणून झाले, 'ना! ना!' म्हणून झाले!
ठरल्यानुसार दैवा जगणे जगून झाले.


मीही तसाच आहे, तीही तशीच आहे...
लांबून एकमेकां हे चाचपून झाले.


करशील काय आता उचलून तू कुर्‍हाडी,
आतून पूर्ण माझे जर उन्मळून झाले!


मज राहिला अताशा कसलाच शौक नाही.
दु:खातला विदूषक माझे बनून झाले!


माझा मलाच मी का कोठेच सापडेना?
आयुष्य भोवताली सगळे खणून झाले.


काळीज आज बहुधा झाले सुरू कण्हाया...
आत्ताच कालपरवा माझे हसून झाले!
                                                    - मयूर

गझल: 

प्रतिसाद

लाजबाब !

करशील काय आता उचलून तू कुर्‍हाडी,
आतून पूर्ण माझे जर उन्मळून झाले!
माझा मलाच मी का कोठेच सापडेना?
आयुष्य भोवताली सगळे खणून झाले.


सुंदर...छान.
स्वागत आणि शुभेच्छा.

करशील काय आता उचलून तू कुर्‍हाडी,
आतून पूर्ण माझे जर उन्मळून झाले!

सुंदर शेर !
 

करशील काय आता उचलून तू कुर्‍हाडी,
आतून पूर्ण माझे जर उन्मळून झाले!
क्या बात है. गझल आवडली.

कुर्‍हाडी आणि काळीज शेर खासच!!

करशील काय आता उचलून तू कुर्‍हाडी,
आतून पूर्ण माझे जर उन्मळून झाल