आपण दोघे
कधी संयमी, कधी अनावर आपण दोघे;
हो-नाहीच्या उंबरठ्यावर आपण दोघे.
क्षुल्लक-क्षुल्लक कारणांवरुन भांडण करतो;
स्वत:च हसतो नंतर त्यावर आपण दोघे.
बोलायाचे तेच बोलतो नेमके तरी,
उगीच करतो आवर-सावर आपण दोघे.
कशास येतो अहंकार हा आपल्यामधे;
शोधू उत्तर ह्या प्रश्नावर आपण दोघे.
जरी माहिती कहाणीस ह्या शेवट नाही;
कधी न घेतो तरी मनावर आपण दोघे.
- संवेदना रायटर्स कंबाईन, अकोला
मोबाईल : ९९२३०७५७४३
गझल:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
सोम, 11/02/2008 - 06:32
Permalink
स्वत:च हसतो नंतर...
वा, एक फोन कर ह्या मस्त गझलेनंतर बऱ्याच दिवसांनी आलेली ही गझलही फार आवडली आणि विशेषतः खालील दोन शेर:
क्षुल्लक-क्षुल्लक कारणांवरुन भांडण करतो;
स्वत:च हसतो नंतर त्यावर आपण दोघे.
वा!वा!
बोलायाचे तेच बोलतो नेमके तरी,
उगीच करतो आवर-सावर आपण दोघे.
वा!वा!
पुढील गझलेची वाट बघतो आहे.
अनंत ढवळे
शुक्र, 15/02/2008 - 09:02
Permalink
छान !
हो-नाहीच्या उंबरठ्यावर आपण दोघे.
छानच !
मानस६
शुक्र, 15/02/2008 - 21:13
Permalink
जरी माहिती कहाणीस ह्या शेवट नाही;
जरी माहिती कहाणीस ह्या शेवट नाही;
कधी न घेतो तरी मनावर आपण दोघे... मक्ता आवडला
-मानस६
धोंडोपंत
शनि, 16/02/2008 - 09:49
Permalink
वा वा वा वा
वा वा वा वा,
रूपेशराव,
छान सहजसुंदर ग़ज़ल. एकदी एक फोन कर सारखी. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
आपला,
(चाहता) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
चक्रपाणि
गुरु, 21/02/2008 - 01:09
Permalink
वा!
सुंदर गझल.
कधी संयमी, कधी अनावर आपण दोघे;
हो-नाहीच्या उंबरठ्यावर आपण दोघे.
क्षुल्लक-क्षुल्लक कारणांवरुन भांडण करतो;
स्वत:च हसतो नंतर त्यावर आपण दोघे.
हे शेर विशेष आवडले.
- चक्रपाणि जीवन चिटणीस
--------उमेश चौ... (not verified)
शुक्र, 14/03/2008 - 16:35
Permalink
हो-नाहीच्या उंबरठ्यावर आपण दोघे.
वा वा वा वा,..............
हो-नाहीच्या उंबरठ्यावर आपण दोघे.
१ सुंदर गझल.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा
--------उमेश चौधरी (लसलगाव)
--------उमेश चौ... (not verified)
शुक्र, 14/03/2008 - 16:36
Permalink
हो-नाहीच्या उंबरठ्यावर आपण दोघे.
वा वा वा वा,..............
हो-नाहीच्या उंबरठ्यावर आपण दोघे.
१ सुंदर गझल.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा
--------उमेश चौधरी (लासलगाव -नाशिक)
ॐकार
शनि, 15/03/2008 - 11:02
Permalink
असेच
म्हणावेसे वाटते. छान!
केदार पाटणकर
गुरु, 20/03/2008 - 12:07
Permalink
रूपेश, खूप छान.
पहिला, तिसरा आणि पाचवा..तीनही शेर उर्दू गझलेच्या माहोलमध्ये नेणारे.
रूपेश, खूप छान.
प्रदीप कुलकर्णी
गुरु, 20/03/2008 - 15:05
Permalink
उत्तम गझल...
उत्तम गझल... निसटली होती माझ्याकडून ! सगळेच शेर आवडले.
हा खासच -
कधी संयमी, कधी अनावर आपण दोघे;
हो-नाहीच्या उंबरठ्यावर आपण दोघे.
वा...वा...वा....
मला आठवले -
हो-नाहीच्या हिंदोळ्यावर झुलायचे...पण किती किती ?
अनामिकेच्या प्रीतीसाठी झुरायचे...पण किती किती ?
शुभेच्छा रूपेश...तुझ्या पुढील गझलेची वाट पाहत आहे...येऊ दे !