अंतरास जाळते व्यथा

अंतरास जाळते व्यथा मनातली
सांगतो कथा प्रिये तुला मनातली

पाहुनी कुणास रोज जीव  धडधडे
ही कुणा कळेल का नशा मनातली

शोधतो चहूकडे मी सारखे तुला
सांग ना सुखा तुझी दिशा मनातली

सागरा समान दु:ख काळजात या
ही  न  पेलवे मला कळा मनातली

आणलीत माणसे जगात तू तुझ्या
तार मात्र तोडली  मना  -मनातली
                                 
                             ----   स्नेहदर्शन {धुळे}{९२२६८६७१५७}

 

 

 

गझल: 

प्रतिसाद

पाहुनी कुणास रोज जीव  धडधडे
ही कुणा कळेल का नशा मनातली
  माफ करा लिहण्यात चूक झली

नेहमीप्रमाणेच मिसऱ्यांतला सफाईदारपणा लोभसवाणा आहे. स्वरकाफियांची गझल मी
स्वतः लिहीत नाही आणि तिचा मी सध्यातरी पुरस्कर्ता नाही, हा भाग
अलाहिदा पण ही स्वरकाफिये असलेली गझल छानच आहे.

शोधतो चहूकडे मी सारखे तुला
सांग ना सुखा तुझी दिशा मनातली

सागरा समान दु:ख काळजात या
ही  न  पेलवे मला कळा मनातली

 विशेषतः दोन शेर फारच आवडले. स्नेहदर्शन, पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा.

सागरा समान दु:ख काळजात या
ही  न  पेलवे मला कळा मनातली
चांगला शेर...