मला ठावुक की...

मला ठावुक की... क्षणभर तिथे तू थांबली होती
जरा वळताच मी मागे, कशी तू... धावली होती

तुझ्या डोळ्यातली तगमग नि सोबत बोलणे हळवे
मनाची चलबिचल सारी तुझी... मी जाणली होती

जरा आठव पुन्हा राणी फिरुन ती भेट अवचितशी
तशी ती वेळ अजब नि तू किती.. भांबावली होती

मला स्मरते अजुन सारे... तुलाही आठवते आहे
तुझ्या ना जाणिवा परक्या... जरी रागावली होती

खुलासा मीच केला हा... तुला समजावण्यासाठी
खरे तर ते खरे... ज्याने मनी धास्तावली होती

जशी समजावली होती... समजुनी घेतली नाही
सरळ सोपी कहाणी ही... थेट ह्रदयातली होती

- जनार्दन केशव म्हात्रे
२/ खलिफा निवास, गांधी नगर, जुना बेलापूर रोड,
कळवा-ठाणे ४००६०५.  भ्रमणध्वनी: ९३२३५५५६८८

गझल: 

प्रतिसाद

गझल छानच. उडत्या लयीची सुंदर बांधणी  आहे. आवडली. बर्‍यापैकी मुसलसल गझल वाटते (मी बरोबर असेन तर).
एक दोन शंका - निर्विवाद अस्सलतेसाठी...
१. क्रियापदाचे रूप '...होतीस' असे असायला हवे. 'चालते' म्हणून स्वीकारू नये.
२. 'तशी ती वेळ अजब नि तू....' मधील 'नि' दीर्घ उच्चारावा लागतो आहे. मान्यवरांकडून तपासून घेणे.
३. 'मला ठाऊक की...' मध्ये 'क...की ' टाळता आले तर पहावे.
शुभेच्छा.

प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

आपली सूचना...
२. 'तशी ती वेळ अजब नि तू....' मधील 'नि' दीर्घ उच्चारावा लागतो आहे. मान्यवरांकडून तपासून घेणे.
स्पष्टीकरण...
लगावली अशी आहे...

लगागागा   लगागागा   लगागागा   लगागागा
१ २ २ २   १ २ २ २   १ २ २ २   १ २ २ २   =  २८ मात्रा
    ७          ७           ७          ७         =  २८ मात्रा
वृत्त आहे : वियदगंगा

लगा गा गा      ल  गा    गा   गा       लगा    गागा       लगा गागा
तशी ती  वे        ळ अज बनि तू       किती.. भांबा      वली होती

जरा आठव पुन्हा राणी फिरुन ती भेट अवचितशी
तशी ती वेळ अजब नि तू किती.. भांबावली होती

मला ठावुक की... क्षणभर तिथे तू थांबली होती
जरा वळताच मी मागे, कशी तू... धावली होती

तुझ्या डोळ्यातली तगमग नि सोबत बोलणे हळवे
मनाची चलबिचल सारी तुझी... मी जाणली होती... हे शेर जास्त आवडले..
-मानस६

लगावलीबद्दल अजिबात शंका नव्हती. उच्चाराबद्दल म्हणूनच स्पष्ट उल्लेख केला होता. हट्ट न करता अजूनही मला तसेच म्हणावयाचे आहे. कारण, शेवटी व्याकरणाचे महत्व आपल्या जागी आहेच आहे. निर्दोष होण्यासाठीही आपण प्रयत्न करत राहणे गरजेचे.  स्पष्टीकरणांशिवाय आनंद घेताअभिनंदन्.पुनश्च अभिनंदन.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

लगावलीबद्दल अजिबात शंका नव्हती. उच्चाराबद्दल म्हणूनच स्पष्ट उल्लेख केला होता. हट्ट न करता अजूनही मला तसेच म्हणावयाचे आहे. कारण, शेवटी व्याकरणाचे महत्व आपल्या जागी आहेच आहे. निर्दोष होण्यासाठीही आपण प्रयत्न करत राहणे गरजेचे.  स्पष्टीकरणांशिवाय आनंद घेता यावा.पुनश्च अभिनंदन.

प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

लगा गा गा      ल   गा    गा   गा       लगा    गागा       लगा गागा
तशी ती  वे        ळ अज बनि  तू       किती.. भांबा      वली होती

जरा आठव पुन्हा राणी फिरुन ती भेट अवचितशी
तशी ती वेळ अजब नि तू किती.. भांबावली होती

नि दीर्घ उच्चारावा लागत नाही..

जनार्दन,  होतीस... बद्दल आग्रही असावे असे मला वाटत नाही. पण अनेकदा वृत्तात बसवताना शब्दांचे ऱ्हस्वीकरण किंवा दीर्घीकरण अती झाल्यास किंवा सलग तीन-चार लघू आल्यास रचनेचा रेखीवपणा, सुबकपणा, सफाईदारपणा कमी होऊ शकतो, असे मला वाटते. थोडक्यात ती ओबडधोबड होते.ह्या गझलेत त्यामुळेच बहुधा काहीकाही ठिकाणी ओळ लयीत म्हणता त्रास होतो जसे..मला स्मरते अजुन सारे... तुलाही आठवते आहे ही ओळ. ही वृत्तात नाही असेच वाटले. एक लघू जास्त आहे काय? चूभूदेघे. एकंदर रचना छान आहे.