ऋतू कोणता
न उष्मा, न थंडी,न बरसात आहे
ॠतू कोणता आसमंतात आहे?
तुझ्यावीण सोसू कशी पोर्णिमा ही?
फिका चन्द्र आहे,सुनी रात आहे
किती सुन्न साऱ्याच संवेदना या
जणू जिंदगी दीर्घ कोमात आहे
अता थांबवू ,जीवना ,ही लढाई
तुझी हर घडीला नवी मात आहे
विखुरले जरी लाख तुकडे मनाचे,
तुझा भास प्रत्येक तुकड्यात आहे
गझल:
प्रतिसाद
मानस६
बुध, 23/01/2008 - 23:15
Permalink
किती सुन्न साऱ्याच संवेदना या
किती सुन्न साऱ्याच संवेदना या
जणू जिंदगी दीर्घ कोमात आहे
.. कोमा..चा प्रयोग्..स्वागतार्ह आहे
-मानस६
राजगुडे
मंगळ, 29/01/2008 - 12:39
Permalink
वा ... वा ..
न उष्मा, न थंडी,न बरसात आहे
ॠतू कोणता आसमंतात आहे?
क्या बात है ...
पुलस्ति
मंगळ, 29/01/2008 - 22:03
Permalink
वा
कोमा आणि तुकडे हे शेर विशेष आवडले!