संगतीला संगतीचा...
संगतीला संगतीचा...
संगतीला संगतीचा, दोष हा जडला कसा?
स्पर्श मी करता गुलाबा, हा असा सुकला कसा?
वेदना माझ्या उरीची,आज त्याने ऐकता;
तो जरी पाषाण होता; येवढा रडला कसा?
चालतो मी वाट काटेरी, कधीची आज पण,
देखणा रस्ता फुलांचा, मजकडे वळला कसा?
पुत्र सूर्याचा,वीरोत्तम,क्षात्र धर्मी कर्ण तो;
द्रौपदीची लाज जाता, गप्प रे बसला कसा?
सोयरा नवखा असा, येता बघा त्याच्या घरी,
एक धागा रेशमाचा, तो जुना तुटला कसा?
आज माझ्या ओठीची, भाषा करारी ऐकुनी,
पावलांनी दोन मागे, सिंधु हा सरला कसा?
--मानस६
प्रतिसाद
पुलस्ति
शुक्र, 18/01/2008 - 22:19
Permalink
छान!
मानस - मतला, धागा आणि सिंधु हे शेर आवडले!
कर्ण शेर वाचताना मात्र जरा कसरत झाली :)
चित्तरंजन भट
मंगळ, 22/01/2008 - 12:00
Permalink
सहमत
[quote=पुलस्ति]मानस - मतला, धागा आणि सिंधु हे शेर आवडले!
कर्ण शेर वाचताना मात्र जरा कसरत झाली :)[/quote]
पुलस्तींशी सहमत. तसेच काही शब्द बदलून, शब्दक्रम बदलून(जसे पावलांनी दोन मागे...), जुनी वळणे टाळून गझल अजून सफाईदार करता येईल. मतल्यातल्या दुसऱ्या ओळीतल 'हा' कानांना खटकतो.