जीव....
वेदना जपून मी उरात ठेवतो...
हासराच चेहरा घरात ठेवतो...
तू मनात बैसली म्हणून साजणे..
आज ईश्वरास मंदिरात ठेवतो...
चंद्र जागतो अता पहावया तुला..
तो म्हणून रोज रोज रात ठेवतो...
आठवून कंठ दाटतो पुन्हा तुला..
मी तरी न हुंदका स्वरात ठेवतो...
प्रश्न तू करू नको उगाच साजणे..
मी अनेक प्रश्न उत्तरात ठेवतो...
पेटल्यावरी पुन्हा उरायला नको..
मी म्हणून जीव कापरात ठेवतो...
अमित वाघ.
'गुरूमंदिर', सुधीर कॉलनी, अकोला. -444001.
मो.क्र. 9850239882.
www.gazalnavihotanna.blogspot.com
गझल:
प्रतिसाद
मानस६
रवि, 06/01/2008 - 21:59
Permalink
मस्त आहे
पेटल्यावरी पुन्हा उरायला नको..
मी म्हणून जीव कापरात ठेवतो... सही
-गझल आवडली
-मानस६
प्रदीप कुलकर्णी
सोम, 07/01/2008 - 22:44
Permalink
छान...छान...!
आठवून कंठ दाटतो पुन्हा तुला..
मी तरी न हुंदका स्वरात ठेवतो...
पेटल्यावरी पुन्हा उरायला नको..
मी म्हणून जीव कापरात ठेवतो...
क्या बात है...!!! बहारदार शेर. खूपच छान. शुभेच्छा, अमित.
चित्तरंजन भट
मंगळ, 08/01/2008 - 14:22
Permalink
वा!
पेटल्यावरी पुन्हा उरायला नको..
मी म्हणून जीव कापरात ठेवतो...
वा. सुंदर. गझल छान आहे.