हात तुझा हातात
हात तुझा हातात एकदा.... क्षणभर दे मजला
नंतर जर वाटले तुला तर....अंतर दे मजला
नकोस बांधू कुंपण कारा सभोवती माझ्या
झुळझुळणारा वारा मी, तू...... अंबर दे मजला
सत्ता संपत्ती अन लौकिक काय करू देवा?
आनंदाने जगण्यापुरती भाकर दे मजला
मनोरथाचे अश्व दौडती अजूनही माझ्या
संपव माझे विश्व एकदा...ठोकर दे मजला
कसे जमावे माझे येथिल परक्या उपर्यांशी?
माय मराठी ज्यांची ते ते...मैतर दे मजला
किती राहिले सांग अजूनी जगायचे येथे
असेल जर होकार द्यायचा...लवकर दे मजला
आचमनाला इथे ’'अगस्ती'’ कधिचा बसलेला
दे ! दे ! नियती दु:खाश्रूंचा... सागर दे मजला
----अगस्ती
गझल:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
बुध, 19/12/2007 - 21:49
Permalink
वा!
अगस्ती, गझल अगदी ओघवती, मस्त झाली आहे.
हात तुझा हातात एकदा.... क्षणभर दे मजला
नंतर जर वाटले तुला तर....अंतर दे मजला
वावा!वा! क्या बात है. खालची ओळ आणि त्यातला अनुप्रास तर विशेष.
किती राहिले सांग अजूनी जगायचे येथे
असेल जर होकार द्यायचा...लवकर दे मजला
वा!.. खालची ओळ तर अगदी विशेष.
आचमनाला इथे ’'अगस्ती'’ कधिचा बसलेला
दे ! दे ! नियती दु:खाश्रूंचा... सागर दे मजला
वा! दे! दे! मस्त.
जयन्ता५२
गुरु, 20/12/2007 - 11:32
Permalink
स्वागत!
अगस्तीजी,
बर्याच कालावधीनंतर आपली गझल वाचली व सार्या जुन्या आठवणींची मनात गर्दी झाली.
एखाद्या शिष्याला आपल्या गुरूचे गायन बरेच वर्षानी पुन्हा ऐकायला मिळाल्यावर वाटावे तसे वाटते आहे! आपल्या गझला वाचूनच आम्ही गझल लेखनाचे गमभन शिकलो.
मतला,माय-मराठी,नियती हे शेर खास.
शुभेच्छा.
जयन्ता५२
प्रमोद हरदास
गुरु, 20/12/2007 - 13:55
Permalink
फार आवडली
सत्ता संपत्ती अन लौकिक काय करू देवा?
आनंदाने जगण्यापुरती भाकर दे मजला
मनोरथाचे अश्व दौडती अजूनही माझ्या
संपव माझे विश्व एकदा...ठोकर दे मजला
कसे जमावे माझे येथिल परक्या उपर्यांशी?
माय मराठी ज्यांची ते ते...मैतर दे मजला
आचमनाला इथे ’'अगस्ती'’ कधिचा बसलेला
दे ! दे ! नियती दु:खाश्रूंचा... सागर दे मजला
हे शेर फार फार आवडले...
मिल्या
गुरु, 20/12/2007 - 14:45
Permalink
वा!!!
एकदम तयारीची गजल आहे तुमची
मतला. मायमराठी, लवकर आणि मक्ता खूप आवडले....
तखल्लुसचा फ़ारच प्रभावी वापर केलाय तुम्ही
मानस६
गुरु, 20/12/2007 - 20:07
Permalink
हात तुझा हातात एकदा.... क्षणभर दे मजला
हात तुझा हातात एकदा.... क्षणभर दे मजला
नंतर जर वाटले तुला तर....अंतर दे मजला
नकोस बांधू कुंपण कारा सभोवती माझ्या
झुळझुळणारा वारा मी, तू...... अंबर दे मजला
कसे जमावे माझे येथिल परक्या उपर्यांशी?
माय मराठी ज्यांची ते ते...मैतर दे मजला
किती राहिले सांग अजूनी जगायचे येथे
असेल जर होकार द्यायचा...लवकर दे मजला
आचमनाला इथे ’'अगस्ती'’ कधिचा बसलेला
दे ! दे ! नियती दु:खाश्रूंचा... सागर दे मजला
हे सगळे शेर अतिशय भावले... एक खूप चांगली गझल वाचल्याचे समाधान मिळाले..
-मानस६
पुलस्ति
सोम, 24/12/2007 - 08:45
Permalink
वा!
शेवटचे २ शेर अतिशय आवडले!!
अनंत ढवळे
शनि, 29/12/2007 - 10:46
Permalink
सुंदर गझल
मनोरथाचे अश्व दौडती अजूनही माझ्या
संपव माझे विश्व एकदा...ठोकर दे मजला
छानच !!
अनंत ढवळे
शनि, 29/12/2007 - 10:46
Permalink
सुंदर गझल
मनोरथाचे अश्व दौडती अजूनही माझ्या
संपव माझे विश्व एकदा...ठोकर दे मजला
छानच !!
अनंत ढवळे
शनि, 29/12/2007 - 10:46
Permalink
सुंदर गझल
मनोरथाचे अश्व दौडती अजूनही माझ्या
संपव माझे विश्व एकदा...ठोकर दे मजला
छानच !!