एक फोन कर...
नको उभारू असा दुरावा एक फोन कर..!
ठरेल खोटा तुझाच दावा एक फोन कर..!
असे कशाला एकएकटे झुरायचे तू;
अर्धा वाटा मला मिळावा एक फोन कर..!
नकोस बोलू एक शब्दही... फक्त रिंग दे..
तुझा अबोला मला कळावा एक फोन कर..!
म्हणायची हक्काने मजला, 'घरी निघुन ये..'
पुन्हा येवुदे असा बुलावा एक फोन कर..!
'क्षणोक्षणी मी तुझी आठवण काढत असते'
ह्या गोष्टीला काय पुरावा...? एक फोन कर..!
गझल:
प्रतिसाद
प्रदीप कुलकर्णी
रवि, 14/10/2007 - 22:12
Permalink
स्वागत
रूपेश,
स्वागत...
छान गझल...शुभेच्छा !
चित्तरंजन भट
रवि, 14/10/2007 - 22:47
Permalink
गझल आवडली
नकोस बोलू एक शब्दही... फक्त रिंग दे..
तुझा अबोला मला कळावा एक फोन कर..!
मस्तः) मस्तच गझल आहे. फार आवडली. हिट होणार आहे.
पुलस्ति
सोम, 15/10/2007 - 20:30
Permalink
छान!
रिंग आणि पुरावा शेर आवडले.
पु.ले.शु.!
प्रमोद बेजकर
सोम, 15/10/2007 - 23:24
Permalink
तरूण भाषा
आजच्या भाषेतली गजल.अशी रोजच्या व्यवहाराशी संबंधित गजल लिहिली गेली तर तिची पुढल्या पिढीशी आपसुकच नाळ जोडली जाईल. आगे बढो.
प्रज्ञा
बुध, 17/10/2007 - 17:23
Permalink
सुंदर
सुंदर गझल आहे. सगळेच शेर मनापासुन आवडले. रिंग दे तर अतिशय सुंदर.
धोंडोपंत
शुक्र, 19/10/2007 - 19:57
Permalink
क्या बात है !!
अप्रतिम गझल. फार मजा आली.
आज आम्ही इतक्या दिवसांनी इथे आलो आणि तुम्ही आमचा मूडच पालटून टाकलात. काय सुंदर रदीफ आहे. "एक फोन कर". वा वा.
लय भारी गझल. लय म्हणजे लयचं. शब्दचं नाहीत आपल्याकडे.
ओघवती लेखनशैली आहे. प्रत्येक शेर अप्रतिम. तुमच्याकडून अपेक्षा फार मोठ्या आहेत.
आम्ही या गझलेवर निहायत फ़िदा आहोत.
आपला,
(प्रभावित) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
चक्रपाणि
गुरु, 25/10/2007 - 13:55
Permalink
सहमत आहे
दुमत नाही!
- चक्रपाणि जीवन चिटणीस
जनार्दन केशव म्...
शुक्र, 14/12/2007 - 20:41
Permalink
फ़िदा... फ़िदा...
असे कशाला एकएकटे झुरायचे तू;
अर्धा वाटा मला मिळावा एक फोन कर..!
नकोस बोलू एक शब्दही... फक्त रिंग दे..
तुझा अबोला मला कळावा एक फोन कर..!
या गझलेवर निहायत फ़िदा...
अजब
शनि, 15/12/2007 - 14:21
Permalink
वा!
गजल आवडली. डॉ. बेजकरांशी सहमत.
अजब
ॐकार
शनि, 15/03/2008 - 11:03
Permalink
अबोला
आवडला :)
मुकुन्दा (not verified)
शनि, 15/03/2008 - 20:25
Permalink
सुरेख
सुरेख अप्रतिम
पंकज (not verified)
बुध, 02/04/2008 - 17:03
Permalink
गजल
अशी हास्य गजल हिंदीत ही फार कमी वाचायला मिळाली
ई-मेल, मोबाईल मसेज, चटिंग आदिवरती पण लिहावी
धन्यवाद |
- पंकज
पीएएनकेए@जीमेल.काम
हर्शसोलस्कर
बुध, 16/04/2008 - 06:49
Permalink
खुप
खुप सुन्दर्,सुरेख..............................स्नेहल यादव.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बुध, 16/04/2008 - 11:16
Permalink
असेच म्हणतो
आजच्या भाषेतली गजल.अशी रोजच्या व्यवहाराशी संबंधित गजल लिहिली गेली तर तिची पुढल्या पिढीशी आपसुकच नाळ जोडली जाईल. आगे बढो.
सुंदर गजल !!!
आजानुकर्ण
बुध, 16/04/2008 - 18:33
Permalink
झकास
रुपेशशेठ, गझल फार आवडली. अगदी मनापासून. विशेषतः हा शेर तर अप्रतिम
'क्षणोक्षणी मी तुझी आठवण काढत असते'
ह्या गोष्टीला काय पुरावा...? एक फोन कर..!
आपला,
-(हर्षभरित) आजानुकर्ण