बांधुन मी...
बांधुन मी घेतल्या न भवती कधी फुकाच्या भिंती
आकाशाच्या पलीकडे निर्मिल्या यशाच्या भिंती
उन्-वार्याचे अन पाण्याचे... मला वावडे नाही
परिस्थितीने मजबुत केल्या आयुष्याच्या भिंती
आरोपांनी अन दुषणांनी... तडे हजारो गेले
तरी संकुचित झाल्या नाहित कधी मनाच्या भिंती
रात्रं-दिन हे दु:खच माझे... सक्त पहारा देते
म्हणुन सुरक्षित मी अन माझ्या मौन सुखाच्या भिंती
स्क्वेअरफुटाच्या हिशोबातल्या घरात वावरताना
आठवती मज साद घालती, पुन्हा कुडाच्या भिंती
ममतेची मोकळी हवा ती... गॅलरीत या नाही
किती हासर्या चाळीच्या अन माजघराच्या भिंती
खूप वादळे आली-गेली, पण.. मी खचलो नाही
जिद्दीच्या पायावर... माझ्या अस्तित्वाच्या भिंती
- जनार्दन केशव म्हात्रे
२/ खलिफा निवास, गांधी नगर, जुना बेलापूर रोड,
कळवा-ठाणे ४००६०५. भ्रमणध्वनी: ९३२३५५५६८८
प्रतिसाद
rind
शुक्र, 14/12/2007 - 13:57
Permalink
मत्ला अप्रतिम
वा!
खूप वादळे आली-गेली, पण.. मी खचलो नाही
जिद्दीच्या पायावर... माझ्या अस्तित्वाच्या भिंती
जबरदस्त शेर
जनार्दन केशव म्...
शुक्र, 14/12/2007 - 19:48
Permalink
दिलीपजी / चित्तदा...
प्रेम अन प्रोत्साहन असेच असू दे...
चित्तरंजन भट
शुक्र, 14/12/2007 - 16:38
Permalink
असेच.
[quote=rind]
वा!
खूप वादळे आली-गेली, पण.. मी खचलो नाही
जिद्दीच्या पायावर... माझ्या अस्तित्वाच्या भिंती
जबरदस्त शेर[/quote]
असेच.
मानस६
शुक्र, 14/12/2007 - 19:11
Permalink
खूप वादळे आली-गेली, पण.. मी खचलो नाही
खूप वादळे आली-गेली, पण.. मी खचलो नाही
जिद्दीच्या पायावर... माझ्या अस्तित्वाच्या भिंती.
मस्त शेर
-मानस६
धोंडोपंत
शुक्र, 21/12/2007 - 13:42
Permalink
वा वा
वा वा जनार्दनराव,
गझल आवडली. सुंदर.
स्क्वेअरफुटाच्या हिशोबातल्या घरात वावरताना
आठवती मज साद घालती, पुन्हा कुडाच्या भिंती
ममतेची मोकळी हवा ती... गॅलरीत या नाही
किती हासर्या चाळीच्या अन माजघराच्या भिंती
क्या बात है !!
आपला,
(चाळकरी) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
दीपा
गुरु, 17/01/2008 - 14:20
Permalink
वा...
खूप वादळे आली-गेली, पण.. मी खचलो नाही
जिद्दीच्या पायावर... माझ्या अस्तित्वाच्या भिंती
आशावादी लेखनाचा सल्ला आधीच पाळला आहेस..
खूपच छान..............
पुलस्ति
गुरु, 17/01/2008 - 23:46
Permalink
वा!
शेवटचे २ शेर मस्तच!!
अभिषेक उदावंत
शनि, 19/01/2008 - 13:30
Permalink
सत्य परिस्थिती...
उन्-वार्याचे अन पाण्याचे... मला वावडे नाही
परिस्थितीने मजबुत केल्या आयुष्याच्या भिंती
छान हा शेर आवडला....
राजगुडे
मंगळ, 29/01/2008 - 12:18
Permalink
फ्लॅट झालो...
स्क्वेअरफुटाच्या हिशोबातल्या घरात वावरताना
आठवती मज साद घालती, पुन्हा कुडाच्या भिंती
ममतेची मोकळी हवा ती... गॅलरीत या नाही
किती हासर्या चाळीच्या अन माजघराच्या भिंती
फ्लॅट झालो...
सोनाली जोशी
मंगळ, 01/04/2008 - 23:39
Permalink
मस्त
ममतेची मोकळी हवा, स्वेअरफुटाचे शेर एकदम वेगळे वाटले. आवडले. मक्त खूप आवडला.
चक्रपाणि
बुध, 02/04/2008 - 08:11
Permalink
वाव्वा!
गझल फारच आवडली. स्क्वेअरफुटाचे हिशेब लाजवाब. शेवटचा शेरही मस्त. एकंदर छानच.
- चक्रपाणि जीवन चिटणीस