तुला या शोधती तारा
तुला या शोधती तारा
तुझ्यासाठी झुरे वारा
पुन्हा वेडावला वारा
थबकला गंध जाणारा
नको जाऊ अशा रात्री
अरे, तू एकटा तारा
दिले धोके उजेडाने
पुसू या वाट अंधारा
मला ना पेलवे आता
व्यथांचा कोण डोलारा!
दिलीप पांढरपट्टे
गझल:
तुला सोडूनही येतो पुन्हा मी
तुझ्यापाशीच माघारा कितीदा !
तुला या शोधती तारा
तुझ्यासाठी झुरे वारा
पुन्हा वेडावला वारा
थबकला गंध जाणारा
नको जाऊ अशा रात्री
अरे, तू एकटा तारा
दिले धोके उजेडाने
पुसू या वाट अंधारा
मला ना पेलवे आता
व्यथांचा कोण डोलारा!
दिलीप पांढरपट्टे
प्रतिसाद
जनार्दन केशव म्...
शुक्र, 14/12/2007 - 13:44
Permalink
तुझ्यासाठी झुरे वारा...
पुन्हा वेडावला वारा
थबकला गंध जाणारा
बहोत खूब...
rind
शुक्र, 14/12/2007 - 13:48
Permalink
धन्यवाद
जनार्दन्,आभारी आहे