कालचा प्रवास पुन्हा


कालचा प्रवास पुन्हा
तोच विजनवास पुन्हा

मी,गडे, उदास इथे
एकदाच हास पुन्हा

जाहली विराण वने
संपले सुवास पुन्हा

हा असा कसा चकवा?
तूच आसपास पुन्हा

या तुझ्याच आठवणी
हा जुनाच त्रास पुन्हा


                    दिलीप पांढरपट्टे

गझल: 

प्रतिसाद

पहिला आणि शेवटचा शेर फार आवडला!!

हा असा कसा चकवा?
तूच आसपास पुन्हा

वाव्वा!

या तुझ्याच आठवणी
हा जुनाच त्रास पुन्हा

वाव्वा! गझल फार आवडली.

तोच विजनवास पुन्हा
व्वा !

या तुझ्याच आठवणी
हा जुनाच त्रास पुन्हा
हवा-हवासा अनुभव आहे...

या तुझ्याच आठवणी
हा जुनाच त्रास पुन्हा
हवा-हवासा अनुभव आहे...