अजून कोणी तरी मनाशी...(जुनी)


कुणास नाही तरी मला तो दिसतो आहे
अजून कोणी तरी मनाशी वसतो आहे


मला असे भान भावनांचे.., पण हा वेडा,...
...धरून हातात इंद्रियांना हसतो आहे...!


मलाच माझ्या सुसाटतेचे भय का वाटे..?
कुठे पळावे.. किती पळावे...?..पुसतो आहे..


बटा तुझ्या आवरून घे ना, सखये, बाई...
सुगंध हा बावऱ्या मनाला डसतो आहे


कळे मला भास जीवनाचा छळतो आहे..!
..तरी पुन्हा श्वास घेत का मी फसतो आहे..?


पुन्हा कुणाच्या सभेत मी रे कसचा जातो..?
इथे मला मैफलीत जो तो हसतो आहे..!


उगीच का वाहवा मिळाली गझलेला ह्या..?
कुठेतरी मी मनात त्यांच्या ठसतो आहे



('मौनात एकट्याशी' मधून...)
    - प्रा.डॉ.संतोष कुलकर्णी, उदगीर
अलामतीतून मतल्यातच सुटका.....!

गझल: 

प्रतिसाद

कुणास नाही तरी मला तो दिसतो आहे
अजून कोणी तरी मनाशी वसतो आहे

'सुसाटतेचे भय' वाव्वा!!!, मतला आणि शेवटचा शेर विशेषच. कसलेली गझल.

 'सखये, बाई' बऱ्याच दिवसांनी एकत्र वाचले. मजा वाटली.  सभेच्या शेरात 'कसचा' ऐवजी 'कसला'हवे होते का? 'कसचा'ही चालते.



मनापासून....
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

दोन्ही चालते. 'कसचा' बोलीभाषेच्या प्रतिध्वनित्वासाठी...
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

पुन्हा कुणाच्या सभेत मी रे कसचा जातो..?
इथे मला मैफलीत जो तो हसतो आहे..!

छान! फार आवडले.
- चक्रपाणि जीवन चिटणीस

भय, बटा, श्वास - हे शेर विशेष आवडले!!

गजल आवडली. पहिले ३ शेर विशेष आवडले.
अजब

सुंदर गझल !!
मलाच माझ्या सुसाटतेचे भय का वाटे..?
फारच छान ...