सुधारित "किनारा..."
तिला मी भेटतो आहे पुन्हा... रोखा मला...
कितीदा देत आहे मी असा धोका मला...
दिगंताहूनही मी दूर गेलो एवढा..
जराही शक्य नाही ऐकणे हाका मला..
दिली संधी तरीही बोलली नाहीस तू..
अता मागू नको तू एकही मोका मला..
नकोसे वाटते आता तिचे मज नावही..
नकोसा काळजाचा त्यामुळे ठोका मला..
किनारा तू नकोरे दाखवू मज सागरा..
किनारी न्यायची नाही कधी नौका मला..
गझल:
प्रतिसाद
अमित वाघ
शनि, 10/11/2007 - 14:43
Permalink
आभार....
रोखा शब्दामुळे स्वरांचा काफिया मिळाला...
क्षितिजातली तसेच तीरामधली सवलत सलत होतीच ...
ती दिगंता आणि किनारी शब्दामुळे दूर झाली ..
'मोका' भट साहेबांमुळे मिळाला....
गझल सुधरवण्यासाठीच प्रकाशित केली होती...
[ जराशी टीका झाली की डोकं अधिक व्यवस्थित चालतं}
मा. चक्रपाणि, पुलस्ति, प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चित्तरंजन भट, समिर चव्हाण यांचे शतशः आभार ...
संतोष कुलकर्णी
बुध, 14/11/2007 - 11:35
Permalink
छान
छान!!
आपले मन निर्मळ आहे. ...आणि म्हणूनच गझलही... सुंदर्..अजून पाठवा...!
अभिनंदन!!!
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०
पुलस्ति
बुध, 14/11/2007 - 19:29
Permalink
अगदी सहमत!
प्राध्यापकसाहेबांशी अगदी सहमत आहे!
अमित, तुम्ही लिहीत राहा, आम्ही नवनवीन गझलांची वाट पाहतो!
चित्तरंजन भट
शुक्र, 16/11/2007 - 14:18
Permalink
सहमत आहे
[quote=संतोष कुलकर्णी]छान!!
आपले मन निर्मळ आहे. ...आणि म्हणूनच गझलही...
[/quote]
संतोषरावांशी सहमत आहे.
चक्रपाणि
मंगळ, 20/11/2007 - 09:43
Permalink
सहमत
आहे.
- चक्रपाणि जीवन चिटणीस