गझल

आग नाही, धूर नाही
राख होणे दूर नाही

घाव केले, खून नाही
हो, तशी ती क्रूर नाही

विरह भोगावा सखीचा
मेळ तिज मंजूर नाही

तागडी दु:खास कसली ?
(एक अश्रू  पूर नाही ?)

धडधडे पाहून तुजला
'भृंग' ते हे ऊर नाही

गझल: 

प्रतिसाद

तागडी दु:खास कसली ?
(एक अश्रू  पूर नाही ?)
वाव्वा!

मिलिन्दपंत,
गझल (छोटी बहर) आवडली. सगळेच शेर सुंदर आहेत.
मला मतला आधी समजला नाही; पण पुन्हा वाचल्यावर-आग नाही, धूर नाही
राख होणे दूर नाही

आग आणि धूर दोन्ही नाहीसे होत चाललेत.. आता फक्त राख राहणार आहे, असा अर्थ कळला... तो फारच परिणामकारक आहे.
- कुमार

घाव केले, खून नाही
हो, तशी ती क्रूर नाही

तागडी दु:खास कसली ?
(एक अश्रू  पूर नाही ?)

वावा! क्या बात है! मस्तच शेर!
एक सूचना करावीशी वाटते. गझलेतील बाकीच्या शेरांच्या तुलनेत
मेळ तिज मंजूर नाही मधले 'तिज' अगोड वाटते. त्याबाबत काही करता येईल का?
आमचाही मेळ व्हावा
हे तिला मंजूर नाही

असे केले तर चालेल का?

आमचाही मेळ व्हावा
हे तिला मंजूर नाही


असे केले तर चालेल का?यात विरह भोगण्याची (दोन्ही अर्थाने) संकल्पना येत नाही.

धडधडे पाहून तुजला
'भृंग' ते हे ऊर नाही
-हा 'मिलिंद' मक्त्यात गुंजारव करतोय. वा!
'धडधडे' ऐवजी  'गुणगुणे' वापरले असते तर?

खूपच सुन्दर गजल !
मक्ता जास्त आवडला !

तागडी दु:खास कसली ?
(एक अश्रू पूर नाही ?)

अप्रतिम गझल!!!