नशा

जराशी जराशी नशा, ही चढावी
तुझी ऊब गात्रात, माझ्या असावी

जरा चोरुनी तू, मला न्याहळावे
जराशी तुझी, पापणी अन् लवावी

जरा लाजुनी तू 'नको रे' म्हणावे
मिठी लाजरी त्याचवेळी पडावी

तुझा श्वास, श्चासत माझ्या भिनावा
नशेला नव्याने, झळाळी चढावी

तुला मी, मला तू, असे नीववावे
पुन्हा एक ज्वाळा उफाळून यावी

-- सदानंद डबीर    

प्रतिसाद

मक्ता आवडला.

डबीरसाहेब,
वा!
तुला मी, मला तू, असे नीववावे
पुन्हा एक ज्वाळा उफाळून यावी

हा मक्ता आणि 'तुझी ऊब...' हा मिसरा खूप आवडला.
- कुमार
 

सुन्दर गजल !
मक्ता खूपच आवडला !

गझल आवडली.

जराशी जराशी नशा, ही चढावी
तुझी ऊब गात्रात, माझ्या असावी

हा शेर खासच.

मक्ता ???

गझलेतील ज्या शेरात (शेवटच्या) गझलकाराचे नावं असेल त्याला मक्ता म्हणतात ना?

जाणकारांनी मार्गदर्शन करावे.