पारदर्शी...
जरी वाटती माणसे पारदर्शी...
कुठे कोण पाण्या असे पारदर्शी...?
स्वतःची कशी लाज वाटेल त्याना..
अरे... येथले आरसे पारदर्शी...
कळे काय आहे अवस्था मनाची..
तिचा चेहरा होतसे पारदर्शी...
जसे प्रेम आहे तसे ठेव त्याला..
नको पाहिजे फारसे पारदर्शी...
अखेरी न कळले कुणी वार केले.
सुर्यावर मिळाले ठसे पारदर्शी...
गझल:
प्रतिसाद
नचिकेत
सोम, 22/10/2007 - 09:33
Permalink
व्वा!!!
सुर्यावर मिळाले ठसे पारदर्शी... >> क्या बात है!!!
गझल आवडली!
चित्तरंजन भट
सोम, 22/10/2007 - 10:01
Permalink
असेच
[quote=नचिकेत]सुर्यावर मिळाले ठसे पारदर्शी... >> क्या बात है!!!
असेच.गझल आवडली![/quote]
पुलस्ति
सोम, 22/10/2007 - 19:15
Permalink
सहमत
हा शेर फार आवडला.
बाकीचे शेर मात्र तुमच्या इतर गझला आणि इतर शेरांइतके भावले नाहीत.. राग नसावा. तुमची गझल उघडल्यावर अपेक्षा फार असतात :)
जयन्ता५२
बुध, 24/10/2007 - 11:07
Permalink
पु . ल. स्तिशी सहमत!
अमित,
बाकीचे शेर मात्र तुमच्या इतर गझला आणि इतर शेरांइतके भावले नाहीत.. राग नसावा. तुमची गझल उघडल्यावर अपेक्षा फार असतात :)
-- पुलस्तिशी सहमत!
पहिले चार शेर अर्थाच्या संदर्भात कमी पारदर्शी वाटतात. मक्ता मात्र मस्त जमलाय!
शुभेच्छा!
जयन्ता५२
चक्रपाणि
गुरु, 25/10/2007 - 13:36
Permalink
सहमत आहे
तुमच्या आधीच्या गझला वाचल्या होत्या; पण त्यावेळी वेळेअभावी प्रतिसाद देता येत नव्हता. आता उशीराने प्रतिसाद देतोय. क्षमस्व.
- चक्रपाणि जीवन चिटणीस
अनंत ढवळे
रवि, 28/10/2007 - 20:45
Permalink
तिचा चेहरा होतसे पारदर्शी.
चांगली ओळ !
तिचा चेहरा होतसे पारदर्शी....
तुमच्या गझलेचे मिसरे अतिशय स्वच्छ आहेत...यथावकाश विचार / कल्पना वैविद्ध्याची जोड मिळाल्यावर अत्यंत सकस लिहाल अशी आशा वाटते .अभिनंदन आणि शुभेच्छा!!!