वेग माझ्या पालखीचा मंद होता..
वेग माझ्या पालखीचा मंद होता
वेग माझ्या पालखीचा मंद होता
आसवांचा पूर नि स्वच्छंद होता
ओठ राधेचे अता परके तरीही,
आजही ओठांवरी 'मकरंद' होता
तेच अश्रू ढाळले, जे तू दिलेले,
काय मज ह्या आसवांचा छंद होता?
'बघ जरा, आलोय मी', तु बोलला पण,
जाहला रे श्वास माझा बंद होता
मोरपंखी येथला आराम तरीही,
झोपडी ती!-वेगळा आनंद होता
ह्या किनाऱ्याची अशी दमछाक झाली,
आज हा दरिया कसा बेबंद होता!
-मानस६
प्रतिसाद
कुमार जावडेकर
शनि, 13/10/2007 - 07:01
Permalink
वा!
मानसपंत,
गझल आवडली.
मोरपंखी येथला आराम तरीही,
झोपडी ती!-वेगळा आनंद होता - वा! वा!
ह्या किनाऱ्याची अशी दमछाक झाली,
आज हा दरिया कसा बेबंद होता! - ही कल्पनाही आवडली.
- कुमार
जयन्ता५२
सोम, 15/10/2007 - 11:31
Permalink
मोरपंखी येथला आराम..
मोरपंखी येथला आराम तरीही
झोपडी ती!-वेगळा आनंद होता
ह्या किनाऱ्याची अशी दमछाक झाली
आज हा दरिया कसा बेबंद होता
मानसजी, हे शेर खास आवडले.
गुस्ताखी माफ, पण मतल्याचा शेर मला तरी नीटसा कळला नाही.
जयन्ता५२
चित्तरंजन भट
सोम, 15/10/2007 - 13:42
Permalink
सहमत आहे
[quote=कुमार जावडेकर]मानसपंत,
मानस, कुमाररावांशी सहमत आहे!गझल आवडली.
मोरपंखी येथला आराम तरीही,
झोपडी ती!-वेगळा आनंद होता - वा! वा!
ह्या किनाऱ्याची अशी दमछाक झाली,
आज हा दरिया कसा बेबंद होता! - ही कल्पनाही आवडली.
- कुमार
[/quote]
पुलस्ति
सोम, 15/10/2007 - 20:27
Permalink
अगदी सहमत!
मस्त गझल!