स्वप्न आता पापणीला छळत नाही
स्वप्न आता पापणीला छळत नाही
सत्य कुठले भास कुठला कळत नाही
मी किती वेळा तुला सांगू कहाणी?
राम वनवासात जाणे टळत नाही
तीच तू ,अन चंद्रही तो ,तोच मी ही
(रक्त आहे तेच पण सळसळत नाही)
मी कुणाचा चाहता वा शिष्य नाही
पायवाटेला जुन्या मी वळत नाही
येत नाही वावटळ का अजुन गावी?
फुंकरीने पान इथले हलत नाही
जीवनाचे भान आले, पण उशीरा
अन चिता बेभान आता ़जळत नाही
देठ असता पाकळीला अर्थ आहे
हे तुला कळते तरीही वळत नाही
कस्तुरीचा उगम ना उमगो मृगाला
ज्ञान झाले की कुणीही पळत नाही
प्रतिसाद
मानस६
शनि, 13/10/2007 - 15:58
Permalink
मी किती वेळा तुला सांगू कहाणी?
मी किती वेळा तुला सांगू कहाणी?
राम वनवासात जाणे टळत नाही
तीच तू ,अन चंद्रही तो ,तोच मी ही
(रक्त आहे तेच पण सळसळत नाही)... बहोत खूब
-मानस६
प्रदीप कुलकर्णी
शनि, 13/10/2007 - 16:31
Permalink
अप्रतिम
स्वप्न आता पापणीला छळत नाही
सत्य कुठले भास कुठला कळत नाही
मी किती वेळा तुला सांगू कहाणी?
राम वनवासात जाणे टळत नाही
तीच तू ,अन चंद्रही तो ,तोच मी ही
(रक्त आहे तेच पण सळसळत नाही)
देठ असता पाकळीला अर्थ आहे
हे तुला कळते तरीही वळत नाही
प्रमोदराव, अप्रतिम ..वरील शेरांबाबत तर काही विचारूच नका. लिहीत राहा...शुभेच्छा...
चित्तरंजन भट
रवि, 14/10/2007 - 22:54
Permalink
सहमत
प्रमोदराव, अप्रतिम ..वरील शेरांबाबत तर काही विचारूच नका. लिहीत राहा...शुभेच्छा...
प्रदीपशी सहमत!!
पुलस्ति
सोम, 15/10/2007 - 08:10
Permalink
वा!
प्रमोदजी, मस्त गझल!
सर्वच शेर आवडले. पण राम, पान आणि कस्तुरी हे विशेषच!!
जयन्ता५२
सोम, 15/10/2007 - 09:26
Permalink
दर्जेदार!
डॉ.बेजकर,
स्वप्न आता पापणीला छळत नाही
सत्य कुठले भास कुठला कळत नाही
मी किती वेळा तुला सांगू कहाणी?
राम वनवासात जाणे टळत नाही
देठ असता पाकळीला अर्थ आहे
हे तुला कळते तरीही वळत नाही
----- केवळ दर्जेदार! क्या कहने..
जयन्ता५२
प्रज्ञा
सोम, 15/10/2007 - 18:01
Permalink
सुंदर गझल
स्वप्न आता पापणीला छळत नाही
सत्य कुठले भास कुठला कळत नाही
सुंदर गझल.
ह बा
शनि, 05/06/2010 - 16:50
Permalink
तीच तू ,अन चंद्रही तो ,तोच मी
तीच तू ,अन चंद्रही तो ,तोच मी ही
(रक्त आहे तेच पण सळसळत नाही)
मी कुणाचा चाहता वा शिष्य नाही
पायवाटेला जुन्या मी वळत नाही
अल्टी!!!
अजय अनंत जोशी
शनि, 05/06/2010 - 23:45
Permalink
मी कुणाचा चाहता वा शिष्य
मी कुणाचा चाहता वा शिष्य नाही
पायवाटेला जुन्या मी वळत नाही
सुंदर आणि खरे..!