सडेतोड.....
सुरू एकट्याचीच तडजोड होती..
तिची चालली फक्त धरसोड होती...
कडू वाटले केवढे ऐकतांना...
तुझी बातमी ती जरी गोड होती...
किती नम्रतेने तुला प्रश्न केले...
तुझी उत्तरे का सडेतोड होती...?
विषाची परीक्षा नको घ्यायला पण..
तुला भेटण्याची मला खोड होती..
निघाली न सुर्यातही आग तितकी..
व्यथेला कुठे माझिया तोड होती....
गझल:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
शुक्र, 19/10/2007 - 22:45
Permalink
गोड होती..
कडू वाटले केवढे ऐकतांना...
तुझी बातमी ती जरी गोड होती...
वा! गझल छान आहे.
तुला भेटण्याची मला खोड होती
वा, ओढऐवजी खोड हा बदल आवडला.
चक्रपाणि
गुरु, 25/10/2007 - 13:50
Permalink
छान
गझल आवडली.
कडू वाटले केवढे ऐकतांना...
तुझी बातमी ती जरी गोड होती...
हा शेर तर विशेषच आवडला. मस्त!
सडेतोड बोलणे आणि उद्धट बोलणे, यात जरा गल्लत झाली आहे, असे मला वाटले. नम्र प्रश्नांना उद्धट उत्तरे देणे अयोग्य आहे/असते; पण सडेतोड उत्तर असेल, तर काही हरकत नसावी. म्हणून तो शेर थोडा खटकला. पटल्यास विचार करून पहा.
- चक्रपाणि जीवन चिटणीस