..सरल्या गझला



हातावरच्या सरल्या गझला
रेषांसम ह्या ठरल्या गझला


ह्या हृदयीच्या कुरणावरती
झाल्या गायी ... चरल्या गझला


ती गेल्यावर श्रावण आला
डोळ्यांमधुनी झरल्या गझला


मी सापडलो, गठलो नाही ..
..त्यांनी माझ्या धरल्या गझला


जे बुडवाया आले होते,
तेही बुडले... तरल्या गझला


ही मैफल की भरला अड्डा...!
मी माझ्या आवरल्या गझला


असताना मी पुसले नाही..
..गेल्यावर वापरल्या गझला


यमदूताने केला दावा
"..दिवसांहुनही भरल्या गझला.."


जेथे कोणी जातच नाही
तेथेही वावरल्या गझला


काळाच्या आघातासरशी
पडल्या..पण सावरल्या गझला


मायमराठी रसिकांच्याही
प्रेमाने बावरल्या गझला


                              प्रा.डॉ.संतोष कुलकर्णी, उदगीर

गझल: 

प्रतिसाद

सुंदर....
ती गेल्यावर श्रावण आला
डोळ्यांमधुनी झरल्या गझला
जे बुडवाया आले होते,
तेही बुडले... तरल्या गझला ............ज ब र द स्त
ही मैफल की भरला अड्डा...!
मी माझ्या आवरल्या गझला
असताना मी पुसले नाही..
..गेल्यावर वापरल्या गझला
जेथे कोणी जातच नाही
तेथेही वावरल्या गझला
काळाच्या आघातासरशी
पडल्या..पण सावरल्या गझला

मायमराठी रसिकांच्याही
प्रेमाने बावरल्या गझला
सुंदर, अप्रतिम.....हे  सर्व शे्र फार म्हणजे  फारच आवडले..ज ब र द स्त
 
 

मी सापडलो, गठलो नाही ..
..त्यांनी माझ्या धरल्या गझला

जे बुडवाया आले होते,
तेही बुडले... तरल्या गझला

ही मैफल की भरला अड्डा...!
मी माझ्या आवरल्या गझला

असताना मी पुसले नाही..
..गेल्यावर वापरल्या गझला..
जेथे कोणी जातच नाही
तेथेही वावरल्या गझला....हे शेर खूप आवडले..-मानस६

प्रदीपराव / मानस,
मनापासून धन्यवाद !!!!
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

संतोषराव, सगळेच शेर अगदी उत्तम आहेत.  पण
मी सापडलो, गठलो नाही ..
..त्यांनी माझ्या धरल्या गझला
वाव्वा!
जे बुडवाया आले होते,
तेही बुडले... तरल्या गझला
वा क्या बात है!

आता गझलांना आवरू नका.

मस्त गझल! सर्वच शेर छान. तरल्या आणि आवरल्या हे शेर फार फार आवडले!
यमदूत शेर मला नीटसा कळला नाही.

अप्रतिम गझल. गझलेची गझल. क्या बात है !!!
फारच छान.
आपला,
(प्रभावित) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

यमदूत - अर्थात मृत्यू - 'न्यायला' येतो,  तो 'दिवस ( अर्थात जगण्याचे) - भरल्या'नंतर . प्रत्येकाचे हे जगण्याचे  दिवस भरले की - (आणि  कुणी कशासाठी जगायचे असे ठरलेले असते,  ते करून झाल्यावर) - तो येतोच. 
माझे असे झाले , की माझी 'ती' वेळ (मृत्यू  / यमदूत येण्याची आणि त्यामुळे त्याच्याबरोबर जाण्याची ) ,  दिवस नव्हे तर मी किती गझला लिहिल्यानंतर 'जायला' हवे त्यावरून ठरली. ती मी गझल न लिहिता जगलो असतो त्याच्या अगोदर आली. मी अजून माझे जगण्याचे  दिवस  शिल्लक आहेत असे दाखवून दिले तेव्हा व  तक्रार केली असता,
'यमदूताने केला दावा...दिवसांहुनही भरल्या गझला'.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०