सवाल...
गावात वंचनेच्या माझा महाल होता..
काखेत दु:ख ज्याच्या तो द्वारपाल होता..
"बदलू कसे स्वतःचे गर्भात लिंग आई..?"
निष्पाप अर्भकाचा साधा सवाल होता..!!
बेभान आसवांनी केली अशी कमाई;
आजन्म ठेवलेला ओला रुमाल होता...!
गर्भात प्रेत माझ्या निष्पाप अर्भकाचे;
आयुष्य भोगणारा मृत्यू दलाल होता..
कोड्यात संयमाच्या संन्यास हेलकावे..
आसक्त उत्तराचा जेथे सवाल होता..!
गझल:
प्रतिसाद
प्रदीप कुलकर्णी
सोम, 08/10/2007 - 22:49
Permalink
ज ब र द स्त
गावात वंचनेच्या माझा महाल होता..
काखेत दु:ख ज्याच्या तो द्वारपाल होता.. सुंदर
"बदलू कसे स्वतःचे गर्भात लिंग आई..?"
निष्पाप अर्भकाचा साधा सवाल होता..!! ज ब र द स्त
कोड्यात संयमाच्या संन्यास हेलकावे..
आसक्त उत्तराचा जेथे सवाल होता..! छान कल्पना...पण संदिग्ध !
शुभेच्छा, अमित...छान लिहितोस...लिहीत राहा.
जयन्ता५२
मंगळ, 09/10/2007 - 16:02
Permalink
पूर्ण सहमत
प्रदीपशी सहमत!
बदलू कसे ..
हा शेर तर कायम स्मरणात राहील असा!
जियो!
जयन्ता५२
पुलस्ति
मंगळ, 09/10/2007 - 18:29
Permalink
सशक्त!
गझल फार आवडली अमित!
प्रदीपजी आणि जयंतरावांशी अगदी सहमत - "सवाल"अतिशय थेट, अस्वस्थ करणारा आणि कायम लक्षात राहील असा आहे!!
"दलाल" शेर नीट कळला नाही.
-- पुलस्ति.
चित्तरंजन भट
मंगळ, 09/10/2007 - 18:29
Permalink
मस्त
अमित, गझल आवडली. अर्भकाचा शेर जबरदस्त आहे.
चक्रपाणि
शुक्र, 12/10/2007 - 14:26
Permalink
सहमत
आहे.
वर जयंतरावांनी म्हटल्याप्रमाणे गर्भात वाला शेर लक्षात राहणारा.
- चक्रपाणि जीवन चिटणीस