बस जराशा मी पणाने....

तोडली तू सर्व नाती बस जराशा मी पणाने....
राहिले काही न हाती बस जराशा मी पणाने....

वाहवा करुनी तुझी बघ काम त्यांनी काढले अन्
तू फुगवली फक्त छाती बस जराशा मी पणाने....

लोक आता त्रासले, कंटाळले दुर्लक्षिण्याला..
एकदा घडणार क्रांती बस जराशा मी पणाने....

आसमंती पोचली असली तुझी किर्ती जरीही...
शेवटी होणार माती बस जराशा मी पणाने....

मारल्या गेलेत लाखो,मारल्या जातील लाखो..
लोक झाले आत्मघाती बस जराशा मी पणाने....

गझल: 

प्रतिसाद

अमित,

तोडली तू सर्व नाती बस जराशा मी पणाने....
राहिले काही न हाती बस जराशा मी पणाने....

वाहवा करुनी तुझी बघ काम त्यांनी काढले अन्
तू फुगवली फक्त छाती बस जराशा मी पणाने....

फारच छान. शुभेच्छा.

आपल्या गझलांच्या प्रतिक्षेत...

प्रतिक्षेत आम्हीही..!!!

आसमंती पोचली असली तुझी किर्ती जरीही...
शेवटी होणार माती बस जराशा मी पणाने....

सुंदर गझल!

तोडली तू सर्व नाती बस जराशा मी पणाने....
राहिले काही न हाती बस जराशा मी पणाने....

छान !

अमित,
गझल आवडली, 'बस जराशा मी पणाने' ही रदीफ / 'हाती/नाती' इ. काफियेही.  पण-
लोक आता त्रासले, कंटाळले दुर्लक्षिण्याला..
एकदा घडणार क्रांती बस जराशा मी पणाने....

इथे जरा वेगळी रदीफ असल्यामुळे इतर अर्थाशी तिचा संबंध नाहीसा होतो असं वाटलं.
- कुमार

आसमंती पोचली असली तुझी किर्ती जरीही...
शेवटी होणार माती बस जराशा मी पणाने....

सुंदर गझल!

अग्दी हेच ....

आपल्यासारख्या जाणकारांचे एवढे चांगले प्रतिसाद वाचून.. तेही पहिल्याच गझलला.. माझे पाय तर जमीनीहून दोन इंच वर झालेत...
काय लिहू...
धन्यवाद...
अगदी मनापासून धन्यवाद....

गझल छानच आहे अमित. मी वरील सर्वांशी सहमत आहे. पुढील गझललेखनासाठी शुभेच्छा!