दरवळ
कुणास कळते ह्रदयाची कळ
अपुले आपण असतो केवळ.
असे कसे हे अपुले नाते...
मला घाव अन् तुला कसे वळ?
कुठून आणू उसने मागुन
पुन्हा पुन्हा मी जगण्याचे बळ.
कितीक द्यावी स्पष्टीकरणे...
कितीक आपण काढावा पळ ?
तुला भेटुनी खरेच पटले ....
उगीच नव्हती माझी तळमळ .
तुला बिलगुनी आला वारा
इथे अचानक सुटला दरवळ!
अमोल शिरसाट.
संवेदना रायटर्स कम्बाईन, अकोला.
गझल:
प्रतिसाद
प्रदीप कुलकर्णी
शनि, 22/09/2007 - 19:26
Permalink
फारच छान
कितीक द्यावी स्पष्टीकरणे...
कितीक आपण काढावा पळ ?
तुला बिलगुनी आला वारा
इथे अचानक सुटला दरवळ!
वा...वा...वा...फारच छान. शुभेच्छा.
समीर चव्हाण (not verified)
सोम, 24/09/2007 - 11:16
Permalink
छान
कुणास कळते ह्रदयाची कळ
अपुले आपण असतो केवळ
शुभेच्छा
स्वप्ना
सोम, 24/09/2007 - 14:31
Permalink
अप्रतिम
असे कसे हे अपुले नाते...
मला घाव अन् तुला कसे वळ?
अप्रतिम
चित्तरंजन भट
सोम, 24/09/2007 - 16:35
Permalink
वा!
अमोल, सहजसुंदर गझल आहे. वळ, पळ, दरवळ, केवळ मस्त. सबंध गझल आवडली. वा, ओपनिंग दणकेबाज झाली आहे. येऊ द्या अजून.
संतोष कुलकर्णी
मंगळ, 25/09/2007 - 17:57
Permalink
क्या बात है !
व्वा व्वा !
असे कसे हे अपुले नाते...
मला घाव अन् तुला कसे वळ?
कितीक द्यावी स्पष्टीकरणे...
कितीक आपण काढावा पळ ?
-काय तबीयत आहे !!! फार आवडली गझल. अजून येवू द्या.
* 'ऊसणे' हा शब्द अर्थात 'उसने' असा असावा.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०
पुलस्ति
मंगळ, 25/09/2007 - 20:31
Permalink
मस्त!
सर्वच शेर छान! पळ आणि दरवळ विशेष आवडले!!
-- पुलस्ति.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बुध, 26/09/2007 - 08:23
Permalink
आवडली गझल.
सर्वच ओळी खास आहेत.
तुला बिलगुनी आला वारा
इथे अचानक सुटला दरवळ!
मस्त !
लिहित राहा !
अमोल शिरसाट
गुरु, 27/09/2007 - 20:42
Permalink
आभार!
"ओपनींग" ला झालेल्या स्वागताने सुखावलोय!!!!
आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार!!!
कुमार जावडेकर
गुरु, 27/09/2007 - 21:58
Permalink
वा!
कुणास कळते ह्रदयाची कळ
अपुले आपण असतो केवळ .... वा! हा मतला आवडला, गझलही.
- कुमार
प्रज्ञा
शुक्र, 28/09/2007 - 15:33
Permalink
सुंदर
सुंदर गझल.
कुणास कळते ह्रदयाची कळ
अपुले आपण असतो केवळअतिश्यच सुंदर.......