ही सरिता रुसली आज किनाऱ्यावरती...

ही सरिता रुसली आज किनाऱ्यावरती...

ही सरिता रुसली आज किनाऱ्यावरती
तू सदा कोरडा, मलाच नेहमी भरती

घडविण्यास पाषाणाची ललाटरेषा,
ह्या अनंत धारा अखंड त्यावर झरती

ते तारु बुडुनी अनेक वर्षे झाली,
पण हृदये त्यातिल अजुन जळावर तरती

रे सुटला कोठे छंद पंडु-पुत्रांचा,
द्यूतात आजही पांचालीला हरती

क्षितिजावर भास्कर जळास चुंबुन जाता,
लज्जेच्या रक्तिम लहरी लाटांवरती

मन टाहो फोडे नेत्र परी हे शुष्क,
ह्या वृत्ती माझ्या भेदभाव का करती?

-मानस६


गझल: 

प्रतिसाद

सुंदर गझल मानसपंत,
सगळेच शेर, त्यांतल्या कल्पना आणि अभिव्यक्ती आवडली.ते तारु बुडुनी अनेक वर्षे झाली,
पण हृदये त्यातील अजुन जळावर तरती.. सुंदर..!

तू सदा कोरडा, मलाच नेहमी भरती - वा!!

 - कुमार

 

सुंदर गझल मानसपंत,

सगळेच शेर, त्यांतल्या कल्पना आणि अभिव्यक्ती आवडली.
ते तारु बुडुनी अनेक वर्षे झाली,
पण हृदये त्यातील अजुन जळावर तरती.. सुंदर..!
तू सदा कोरडा, मलाच नेहमी भरती - वा!!

असेच वाटते, मानस.

सुंदर गझल आहे हो. तारू तर अप्रतीमच.

मानस,
गझल आवडली.
'तारू ' वाचून टायटॅनीकची आठवण झाली.
विश्वास

तू सदा कोरडा, मलाच नेहमी भरती आणि तारू आवडले.

अजब

छान!
क्षितिजावर भास्कर जळास चुंबुन जाता,
लज्जेच्या रक्तिम लहरी लाटांवरती

मन टाहो फोडे नेत्र परी हे शुष्क,
ह्या वृत्ती माझ्या भेदभाव का करती?

ही सरिता रुसली आज किनाऱ्यावरती
तू सदा कोरडा, मलाच नेहमी भरती
 
 मतला आणि हे शेर खुपच मस्त आहेत मानस६जी!
बहोत बढिया छान!बा़़की ही मस्त आहेत....
 
 

ही सरिता रुसली आज किनाऱ्यावरती
तू सदा कोरडा, मला नेहमी भरती....वा

घडविण्यास पाषाणाची ललाटरेषा,
ह्या अनंत धारा अखंड त्यावर झरती....सुंदर

क्षितिजावर भास्कर जळास चुंबुन जाता,
लज्जेच्या रक्तिम लहरी लाटांवरती .... कल्पना  छान आहे !


पाषाण, तारू आणि शेवटचा शेर खूप आवडले!!

ही सरिता रुसली आज किनाऱ्यावरती
तू सदा कोरडा, मलाच नेहमी भरती

जबरदस्त!!!

गझल आवडली.
रक्तिम लहरी ...अफाट.