गझल
एक गझल प्रिय मित्र प्रमोद खराडे याची (संतोष कुलकर्णी यांची नव्हे)
मिटवून टाक आता दोघांमधील अंतर..
होवून श्वास माझा आता सदैव वावर...
नावावरी असावा माझ्या जरी गुन्हा हा...
हे एक हृदय माझे केले तुलाच सादर
गंधाळ तू जराशी त्या मोगर्याप्रमाणे
काट्यात आजवर जो बेजार जीव - सावर
छळले जरी जगाने , झिडकारले तरीही...,
करुणा हवी मनातुन,हृदयी अथांग सागर...
झाले तुझे शुभंकर येणे घरात माझ्या,
बघ चांदणे पसरले गगनामधील घरभर...
- प्रमोद खराडे, पुणे
(एक अनावश्यक (?) माहिती - अगदी व्यक्तिगत .. पण मोह आवरत नाही म्हणून प्रमोदची परवानगी गृहित धरून ... शेवटचा शेर त्याला मुलगी झाली तेव्हाचा..मुलगी झाल्यावर नाराज होणरे अनेक बाप मित्र भेटल्याच्या पार्श्वभूमीवर मला प्रमोदचा हा सामान्य माणसातील पुरोगामी अवतार मला कौतुकाचा वाटला. इतर शेरांचे मला माहीत नाही. ते प्फ्रमोदलाच विचारू शकता. बाकी, हा अनावश्यक व्यक्तिगत संदर्भ दिल्याबद्दल मला प्रमोद करील तसे आपणही माफ कराल, अशी आशा..अन्यथा शिक्षाही चालेल्....संतोष कुलकर्णी)
प्रतिसाद
प्रदीप कुलकर्णी
शनि, 01/09/2007 - 00:54
Permalink
अतिसुंदर !
मिटवून टाक आता दोघांमधील अंतर...
होऊन श्वास माझा आता सदैव वावर... सुंदर!
झाले तुझे शुभंकर येणे घरात माझ्या,
बघ चांदणे पसरले गगनामधील घरभर...अतिसुंदर !
कुमार जावडेकर
शनि, 01/09/2007 - 12:12
Permalink
सुंदर
झाले तुझे शुभंकर येणे घरात माझ्या,
बघ चांदणे पसरले गगनामधील घरभर...
सुंदर शेर!
- कुमार
प्रज्ञा
सोम, 03/09/2007 - 12:22
Permalink
सुंदर
झाले तुझे शुभंकर येणे घरात माझ्या,
बघ चांदणे पसरले गगनामधील घरभर...
अतिशय सुंदर. गझल इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
विसुनाना
सोम, 03/09/2007 - 17:00
Permalink
जाणवते
झाले तुझे शुभंकर येणे घरात माझ्या,
बघ चांदणे पसरले गगनामधील घरभर...
हे जाणवत राहते. सातत्याने! (वैयक्तिक)
वा! वा! छान गझल.
चित्तरंजन भट
मंगळ, 04/09/2007 - 12:34
Permalink
हेच म्हणतो
वरील दोन शेर फारच आवडले. गझलही.
चक्रपाणि
बुध, 05/09/2007 - 11:43
Permalink
क्या बात है
गझल मस्तच आहे. सगळेच शेर आवडले. कन्यारत्नाच्या प्राप्तीबद्दलचा शेर तर मस्तच, लक्षात राहण्याजोगा!!
- चक्रपाणि जीवन चिटणीस