नवी गझल

जुमानेनाच जर हे तण कशाला
इमानाने करू खुरपण कशाला

तसे राहूच आपण ओळखीचे
परंतू फ़ारशी घसटण कशाला

पुढे लागेल की नंबर तुझाही
तुला आताच ते दडपण कशाला

हवा पाणी मने सारेच दूषित
इथे नाही तुझी लागण कशाला

समेटाची गरज आहे मलाही
पुन्हा उकरू जुने प्रकरण कशाला

- विजय दिनकर पाटील

गझल: 

प्रतिसाद

पुढे लागेल...हा शेर आवडला.

वा. सगळे शेर आवडले. गझल चांगली झाली आहे.

शेवटचे तीन जास्त आवडले _/\_