गझल

यायचा हाती कसा हा गंध पळता
रानवा-याच्या पुढे मागे न करता

खिन्नता दाटून आली उतरताना
पाहिजे होता तुझा आलेख चढता

अवकळा आली कशाने ह्या घराला
कोण आहे येथला कर्ता सवरता

नाटकामध्ये तसे काहीच नव्हते
वाटला रोमांचकारी मंच हलता

पायरी बदलायची नाही कुणाला
पाहिजे सोपान सा-यांना सरकता

-विजय दिनकर पाटील

गझल: 

प्रतिसाद

पायरी बदलायची..व नाटकामध्ये हे दोन शेर फार भावले.

सगळेच शेर उत्तम , सोपान तर विशेषच . आपल्या युगाचा स्वभाव अचूक पकडला गेला आहे ह्या शेरात .