नाव रिकामी
नाव रिकामी लाटांवरती डोलत होती
कथा कुण्या सफरीची त्यांना सांगत होती
वादळ वेशीबाहेरच घोंघावत राहू दे
- मनोदेवता रोज प्रार्थना ऐकत होती
काही पाने हिरवी होती, काही पिवळी
दोन्ही एका झाडावरती नांदत होती
डोळे दिसले आरश्यामधे लाल सकाळी
एक आठवण पूर्ण रात्रभर बोचत होती
बेत स्वतःचे मनुष्यप्राणी ठरवित होता
एक योजना नियतीसुध्दा आखत होती
गझल:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
बुध, 24/06/2015 - 19:52
Permalink
काही पाने हिरवी होती, काही
काही पाने हिरवी होती, काही पिवळी
दोन्ही एका झाडावरती नांदत होती
वाव्वा.. क्या बात है.
बेत स्वतःचे मनुष्यप्राणी ठरवित होता
एक योजना नियतीसुध्दा आखत होती
वा.
एकंदर गझल आवडली!
विजय दि. पाटील
गुरु, 25/06/2015 - 12:42
Permalink
काही पाने हिरवी होती, काही
काही पाने हिरवी होती, काही पिवळी
दोन्ही एका झाडावरती नांदत होती
डोळे दिसले आरश्यामधे लाल सकाळी
एक आठवण पूर्ण रात्रभर बोचत होती
बेत स्वतःचे मनुष्यप्राणी ठरवित होता
एक योजना नियतीसुध्दा आखत होती
मस्त शेर आहेत.
वादळ वेशीबाहेरच घोंघावत राहू दे - इथे दोन मात्रा जास्त झाल्यात. राहू दे चे 'राहो' केल्यास ओके होईल
केदार पाटणकर
शुक्र, 26/06/2015 - 13:07
Permalink
धन्यवाद चित्त. धन्यवाद विजय.
धन्यवाद चित्त. धन्यवाद विजय.
अनंत ढवळे
शनि, 27/06/2015 - 21:42
Permalink
काही पाने हिरवी होती, काही
काही पाने हिरवी होती, काही पिवळी
दोन्ही एका झाडावरती नांदत होती
सुंदर शेर..
ज्ञानेश.
शुक्र, 03/07/2015 - 13:05
Permalink
सुरेख गझल.
सुरेख गझल.
शेवटचे ३ शेर फार आवडले.
जयदीप
बुध, 23/12/2015 - 08:03
Permalink
मस्त गझल, शेवटचे तीन जास्त
मस्त गझल, शेवटचे तीन जास्त आवडले, धन्यवाद