घर

--------------------------------------

घराला राहिले आता कुठे घर
स्वत:चे गाव सोडुन चालले घर

असे कित्येक जागी वाटते की
इथे नक्कीच नाही आपले घर

कसे माझ्याघरी पोचायचे मी
असे रस्त्यात जर आले तुझे घर

मिळाला फक्त दर्जा 'बायको'चा
तिला सोडून यावे लागले घर

विकत घेऊन आलो एक जागा
विकावे लागले आहे जुने घर

मलाही धीर झाला एकदाचा
तुलाही पाहिजे होते नवे घर

-ज्ञानेश.

-------------------------------------

गझल: 

प्रतिसाद

कसे माझ्याघरी पोचायचे मी
असे रस्त्यात जर आले तुझे घर

मिळाला फक्त दर्जा 'बायको'चा
तिला सोडून यावे लागले घर

विकत घेऊन आलो एक जागा
विकावे लागले आहे जुने घर

वाव्वा.. खूप आवडले हे शेर आणि गझलही.

कसे माझ्याघरी पोचायचे मी
असे रस्त्यात जर आले तुझे घर >> kyaa baat

मलाही धीर झाला एकदाचा
तुलाही पाहिजे होते नवे घर >>> Kyaa baat

sundar gazal

मिळाला फक्त दर्जा 'बायको'चा
तिला सोडून यावे लागले घर

विकत घेऊन आलो एक जागा
विकावे लागले आहे जुने घर

सुंदर शेर्, गझल आवडली !

ज्ञानेशच्या गझलांपेक्षा वेगळाच पोत असलेली गझल... आवडलीच