वाहते चुपचाप आहे खोल पाणी

वाहते चुपचाप आहे खोल पाणी
अनगिनत अंतःप्रवाहांची कहाणी

वेगळे आयुष्यभर संसार केले
एक राजा आणि त्याची एक राणी

सांग, नक्की काय झाले काल रात्री ?
जाग का आली तुला ओशाळवाणी ?

काळ तर आलाय मित्रा प्लॅसटिकचा
वाजवू इतकी नये कलदार नाणी !

संशयालाही जराशी ठेव जागा,
हे कसे असणे तुझे ठायीठिकाणी ?

पोपटा! रे पोपटा! शिकलास कोठे ?
सांग ना, इतकी मिठू अधिकारवाणी?

आपले आयुष्य म्हणजे काय आहे ?
तेच चेह्‌रे, त्याच गप्पा, तीच गाणी

गझल: 

प्रतिसाद

सुरेख !

वाहते चुपचाप आहे खोल पाणी
अनगिनत अंतःप्रवाहांची कहाणी

वेगळे आयुष्यभर संसार केले
एक राजा आणि त्याची एक राणी

सांग, नक्की काय झाले काल रात्री ?
जाग का आली तुला ओशाळवाणी ?

संशयालाही जराशी ठेव जागा,
हे कसे असणे तुझे ठायीठिकाणी ?

आपले आयुष्य म्हणजे काय आहे ?
तेच चेह्‌रे, त्याच गप्पा, तीच गाणी

वा... खूप आवडली गझल.

धन्यवाद, ज्ञानेश!

अख्खी आवड्या ...तेच चेह्‌रे, त्याच गप्पा, तीच गाणी हे तर लयच आवड्या