विश्व समजू लागलो अपुल्या घराला

विश्व समजू लागलो अपुल्या घराला
पोचलो येऊन मी कुठल्या थराला

प्रार्थना माझी फळाला येत आहे
जाणवाया लागलो मी ईश्वराला

आपल्या साधेपणाची कीव आली
एक मी संधी समजलो वापराला

भेटला असता मला तर खैर नव्हती
नेत्र जो तिसरा मिळाला शंकराला

भासले होते मला मुंगीप्रमाणे
पाहिले निरखून जेव्हा अंबराला

- वैभव देशमुख

गझल: 

प्रतिसाद

भेटला असता मला...हा शेर खूप आवडला. एक चमत्कृतीयुक्त विरोधाभास आहे. अनपेक्षित कलाटणी आहे. मस्त शेर.
मतलाही चिंतनीय.

मतला जाम भारी...
सुंदर गझल....

जाणवाया लागलो मी...

Kya Baat Hai, Vaibhav !
Best Gazal.

प्रार्थना माझी फळाला येत आहे
जाणवाया लागलो मी ईश्वरला

आपल्या साधेपणाची कीव आली
एक मी संधी समजलो वापराला

सुंदर शेर, गझल आवडली !

आपल्या साधेपणाची कीव आली
एक मी संधी समजलो वापराला

भेटला असता मला तर खैर नव्हती
नेत्र जो तिसरा मिळाला शंकराला
वा. दोन्ही शेर विशेष आवडली. सुंदर गझल.

गझल आवडली, मतला फारच

सर्वांचे खूप आभार...

masst gazal... :)