आवरण

न यावी आठवण, आहे पुरेसे
न व्हावे जागरण, आहे पुरेसे..

जरी जगलोच नाही आजसुद्धा
तरी टळले मरण, आहे पुरेसे

जगाला भासतो आहे सुखी मी
मला हे आवरण आहे पुरेसे

तुला विसरायचे आहे ठरवले
तुझे इतके स्मरण आहे पुरेसे

जिथे दिसतात मर्यादा स्वत:च्या
असे वातावरण आहे पुरेसे

पुढे मोठा कुणी होईल तो, पण
मुलाचे मूलपण आहे पुरेसे.

- ज्ञानेश.

गझल: 

प्रतिसाद

सुरेख गझल!

लहान बहरातील चांगली गझल. जिथे दिसतात...हा शेर थोडा संदिग्ध आहे. कदाचित् संदिग्ध आहे म्हणूनच विचारांना ऐसपैस अंगण देत आहे.

'पुढे मोठा कुणी होईल तो पण / मुलाचे मूलपण आहे पुरेसे'
वाह वाह, गझल आवडली

सुंदर गझल ज्ञानेष! मरण, आवरण, स्मरण आणि मूलपण खास! वाह!

जगाला भासतो आहे सुखी मी
मला हे आवरण आहे पुरेसे

सुंदर

आवडली

खूप दिवसांनी तुमची गझल पाहून आनंद झाला.
गझल आवडलीच. :)

ज्ञानेश, सुंदर गझल.

मस्तच गझल ज्ञानेश

मरण हा शेर अतिशय आवडला

सुंदर ..

sundar gazal... __/\__

तुला विसरायचे आहे ठरवले
तुझे इतके स्मरण आहे पुरेसे

वातावरण हे खूप आवडले