ऎकले आहे तुला ती साथ देते

वाटते मोठी जगाला भूक माझी
चव बदलली हीच झाली चूक माझी

शेर दूरच एकही मिसरा न सुचतो
वेदना भलतीच झाली मूक माझी

एक पश्चाताप बघतो अंत आहे -
का तुला होती दिली बंदूक माझी!

ऎकले आहे तुला ती साथ देते...
आठवण येते जरी अंधूक माझी

शेवटी निर्ढावलेले प्रश्न रडले
उत्तरे नव्हती जरी भावूक माझी

जयदीप

गझल: 

प्रतिसाद

ऎकले आहे तुला ती साथ देते...
आठवण येते जरी अंधूक माझी

शेवटी निर्ढावलेले प्रश्न रडले
उत्तरे नव्हती जरी भावूक माझी

मस्त शेर आहेत.

नेटकी गझल. मतला खास आहे.

विजय सर, केदार सर...मनापासून आभार :)

'अंधूक' छान आहे. बाकी ठीक.

मी खुलासाही कधी केलाच नाही
कारणे होती जरा नाजूक माझी
हा शेर आठवला ह्या निमित्ताने