आजच्या आज

स्नेह निर्व्याज पाहिजे होता
आजच्या आज पाहिजे होता

ही अदाही बरीच आहे पण
वेगळा बाज पाहिजे होता

तान आहे तशी तयारीची
स्वच्छ आवाज पाहिजे होता

कसनुसे का हसून गेला तो
स्पष्ट नाराज पाहिजे होता

बडवतो काळ दोन बाजूंनी
जन्म पखवाज पाहिजे होता
---------------
विजय दिनकर पाटील

गझल: 

प्रतिसाद

सगळे शेर आवडले

व्वाह सर

कसनुसे का हसून गेला तो
स्पष्ट नाराज पाहिजे होता
छान.

फारच छान. छोट्या बहरातील नेमकी शब्दरचना करून आणि अर्थ स्पष्टपणे पोचविणारी गझल. कसनुसे...हा शेर तर मस्त जमलाय.

आवडली गझल.
नाराज विशेष.

कसनुसे का हसून गेला तो
स्पष्ट नाराज पाहिजे होता

बडवतो काळ दोन बाजूंनी
जन्म पखवाज पाहिजे होता

उत्तम झाली आहे गझल ..

वाह ...