एकटा सागरकिनारा एकटा

एकटा सागरकिनारा एकटा
जन्म ओसरणार सारा एकटा

केवढे अब्जावधी तारे नभी
वेगळा प्रत्येक तारा एकटा

सांग ना देणार कुठवर सावली?
मेघ तो उंडारणारा एकटा

काढली झापड तसे कळले मला
मीच नाही धावणारा एकटा

ऐकले, गिरणीत आता राहतो
फाटका, बेगार वारा एकटा

पांगला मोर्चा, तरी वेडा तिथे
देत आहे क्षीण नारा एकटा

धावणारे धावले झुंडीमध्ये
चालला तो चालणारा एकटा

कण्हत आहे कोण गाभाऱ्यामधे?
पोरका, अगतिक, बिचारा, एकटा...

गझल: 

प्रतिसाद

अप्रतिम !!!
'सप्तरंग' मधे वाचली होती. पुन:प्रत्ययाचा आनंद मिळाला.

पांगला मोर्चा, तरी वेडा तिथे
देत आहे क्षीण नारा एकटा

धावणारे धावले झुंडीमध्ये
चालला तो चालणारा एकटा

कण्हत आहे कोण गाभाऱ्यामधे?
पोरका, अगतिक, बिचारा, एकटा...

हे शेर विशेष आवडले.

काढली झापड तसे कळले मला
मीच नाही धावणारा एकटा

vaa vaa! gazal aavadalee. Gaabhaaraa aani morchaa, tasech 'chaalanaaraa' he adhik aavadale.

सर्व शेर खूप आवडले

अप्रतिम गझल आहे.. खूप आवडली.

धावणारे धावले झुंडीमध्ये
चालला तो चालणारा एकटा

गझल आवडली

सुंदर गझल! वेगळा प्रत्येक तारा, मीच नाही धावणारा, चालणारा आणी क्षीण नारा शेर खुप छान झाले आहेत.

सुंदर गझल! वेगळा प्रत्येक तारा, मीच नाही धावणारा, चालणारा आणी क्षीण नारा शेर खुप छान झाले आहेत.

धूळही झटकून गेली शेवटी
दूरवर तो पाहणारा एकटा
+

shevatcha sher farach chan aahe

शेवटचा शेर फारच छान ईतर सर्व शेर पण आवड्ले.

सांग ना देणार कुठवर सावली?
मेघ तो उंडारणारा एकटा

काढली झापड तसे कळले मला
मीच नाही धावणारा एकटा

कण्हत आहे कोण गाभाऱ्यामधे?
पोरका, अगतिक, बिचारा, एकटा...

क्या बात सर!!!!

धन्यवाद... :)