काय नभाची आहे इच्छा पाहू...

काय नभाची आहे इच्छा पाहू
कसा बरसतो पाउस यंदा पाहू

डोळ्यांची तर तहान भागत आहे
ओठांची मिटते का तृष्णा पाहू

दूर स्वत:पासून जरासे जाऊ
अन् थोडा अपुलाच तमाशा पाहू

करपवणारे ऊन पाहुनी झाले
गोठवणार्‍या आता गारा पाहू

जगण्याची कातडी बडवतो आहे
बघणारा धरतो का ठेका पाहू

बघू कोणते पाउल अंतिम ठरते
कुठे जाउनी सरतो रस्ता पाहू

सोंगुन झाले पीक अता स्वप्नांचे
मळणीचाही क्षण येतो का पाहू

- वैभव देशमुख

गझल: 

प्रतिसाद

जगण्याची कातडी बडवतो आहे
बघणारा धरतो का ठेका पाहू

दूर स्वत:पासून जरासे जाऊ
अन् थोडा अपुलाच तमाशा पाहू
वा. उत्तम झाली आहे गझल.

जगण्याची कातडी बडवतो आहे
बघणारा धरतो का ठेका पाहू

वाह वा !...उत्तम गझल

गझल आवडली.

वा.. गझल आवडली.

सर्वांचे खूप खूप आभार.

उत्तम गझल . खूप आवडली.

उत्तम गझल.

दूर स्वत:पासून जरासे जाऊ
अन् थोडा अपुलाच तमाशा पाहू

जगण्याची कातडी बडवतो आहे
बघणारा धरतो का ठेका पाहू

Vaa vaa! gazal masta aahe.

जगण्याची कातडी बडवतो आहे
बघणारा धरतो का ठेका पाहू

बघू कोणते पाउल अंतिम ठरते
कुठे जाउनी सरतो रस्ता पाहू

हे दोन्ही अप्रतिम आहेत, वैभव !