विषारी केव्हढे वातावरण आहे
विषारी केव्हढे वातावरण आहे
कसा फुत्कारतो कण आणि कण आहे
तुझे हे शहर तर फिरते मसण आहे
मरणघाईत का प्रत्येक जण आहे
कुणी इथली हवा निर्धोक नासवली
कुणी केले नभाचे अपहरण आहे
जणू वस्तीत लखलखत्या अभावांच्या
सनातन चालला अंधारसण आहे
कधी बळकावणे जमलेच नाही तर
इथे विधिवत सुरू सीताहरण आहे
मशागत तू कशी केलीस जमिनीची
इथे तर माजले नुसतेच तण आहे
भयानक हा सरळ नुसता सरळ रस्ता
कधी येणार धोक्याचे वळण आहे
क्षणी एका उभे आयुष्य उलगडते
जणू आयुष्य म्हणजे एक क्षण आहे
पुन्हा गल्ल्या जुन्या चाळून बघतो मी
कुठे ती हरवलेली आठवण आहे
तुझ्या तर चेहऱ्यावरती चरा नाही
अरे हा आरशावरचाच व्रण आहे
गझल:
प्रतिसाद
अनंत ढवळे
बुध, 16/04/2014 - 09:38
Permalink
अप्रतिम गझल आहेः
अप्रतिम गझल आहेः
भयानक हा सरळ नुसता सरळ रस्ता
कधी येणार धोक्याचे वळण आहे
हा शेर विशेष आवडला. सरळधोप आयुष्यात येणारी बेरंगी चांगली व्यक्त झाली आहे
प्रसाद लिमये
बुध, 16/04/2014 - 21:41
Permalink
सगळेच शेर सुंदर आहेत
सगळेच शेर सुंदर आहेत
विषारी केव्हढे वातावरण आहे
कसा फुत्कारतो कण आणि कण आहे
जणू वस्तीत लखलखत्या अभावांच्या
सनातन चालला अंधारसण आहे
कधी बळकावणे जमलेच नाही तर
इथे विधिवत सुरू सीताहरण आहे
भयानक हा सरळ नुसता सरळ रस्ता
कधी येणार धोक्याचे वळण आहे
क्षणी एका उभे आयुष्य उलगडते
जणू आयुष्य म्हणजे एक क्षण आहे
पुन्हा गल्ल्या जुन्या चाळून बघतो मी
कुठे ती हरवलेली आठवण आहे
हे शेर फार आवडले
कैलास
बुध, 16/04/2014 - 23:40
Permalink
क्या बात है !!
क्या बात है !!
कधी बळकावणे जमलेच नाही तर
इथे विधिवत सुरू सीताहरण आहे
भयानक हा सरळ नुसता सरळ रस्ता
कधी येणार धोक्याचे वळण आहे... व्वाह...
विजय दि. पाटील
गुरु, 17/04/2014 - 10:27
Permalink
जबरदस्त गझल.
जबरदस्त गझल.
विचारांमधली स्पष्टता प्रत्येक शेरामधून स्वच्छ्पणे डोकावत आहे. शिकण्यासारखे आहे हे!
प्रदीप कुलकर्णी
मंगळ, 22/04/2014 - 13:36
Permalink
भोवतीच्या सद्यस्थितीवर प्रखर;
भोवतीच्या सद्यस्थितीवर प्रखर; पण संयत भाष्य करणारी जबरदस्त गझल.
प्रत्येक शेर चढत्या क्रमाने आवडला...
आणखीही येऊ द्या...
वैभव देशमुख
शुक्र, 25/04/2014 - 15:44
Permalink
गझल खूप आवडली.
गझल खूप आवडली.
भयानक हा सरळ नुसता सरळ रस्ता
कधी येणार धोक्याचे वळण आहे
पुन्हा गल्ल्या जुन्या चाळून बघतो मी
कुठे ती हरवलेली आठवण आहे
वैभव वसंतराव कु...
मंगळ, 29/04/2014 - 17:09
Permalink
सगळेच शेर सुंदर आहेत . गझल
सगळेच शेर सुंदर आहेत . गझल खूप आवडली
चित्तरंजन भट
सोम, 05/05/2014 - 17:58
Permalink
सगळ्यांचा आभारी आहे. धन्यवाद.
सगळ्यांचा आभारी आहे. धन्यवाद.
सुशांत खुरसाले.
बुध, 07/05/2014 - 14:04
Permalink
भयानक हा सरळ नुसता सरळ रस्ता
भयानक हा सरळ नुसता सरळ रस्ता
कधी येणार धोक्याचे वळण आहे
व्वा ..व्वा ..
खूप आवडली गझल .
सुशांत खुरसाले.
बुध, 07/05/2014 - 14:05
Permalink
भयानक हा सरळ नुसता सरळ रस्ता
भयानक हा सरळ नुसता सरळ रस्ता
कधी येणार धोक्याचे वळण आहे
व्वा ..व्वा ...
गझल खूप आवडली .
सुशांत खुरसाले.
बुध, 07/05/2014 - 23:18
Permalink
भयानक हा सरळ नुसता सरळ रस्ता
भयानक हा सरळ नुसता सरळ रस्ता
कधी येणार धोक्याचे वळण आहे
व्वा ..व्वा ...
खूप आवडली गझल .
देवेंद्र गाडेकर
शुक्र, 09/05/2014 - 14:21
Permalink
व्वा व्वा नभाचे अपहरण _____
व्वा व्वा नभाचे अपहरण _____/\_____
संपूर्ण गझल आवडली ...तुफान
शुभानन चिंचकर
शुक्र, 09/05/2014 - 14:32
Permalink
अप्रतिम गझल.
अप्रतिम गझल.
सगळे शेर दर्जेदार !
बेफिकीर
शुक्र, 09/05/2014 - 14:43
Permalink
जणू वस्तीत लखलखत्या
जणू वस्तीत लखलखत्या अभावांच्या
सनातन चालला अंधारसण आहे
gazal atishay aavadalee.