फिरुन कातरवेळ येता पापणी ओलावते..

'श्यामसे आखमे नमीसी है'ह्या गुलझार ह्यांच्या गझलेच्या भावानुवादाचा प्रयत्न..ह्या गझलेचे मला आवडलेले वैशिष्ठ्य म्हणजे ह्या गझलेतील काफिये-जसे नमीसी, कमीसी,थमीसी, ..गुलझार ह्यांनी नुसते नमी है, कमी है, थमी है असे म्हणण्याऐवजी नमीसी है, थमीसी है,कमीसी है,असे म्हटले आहे, आणि ह्यामुळेच हे काफिये अधिकच अर्थवाही झाले आहेत, असे मला नेहमी वाटत आले आहे;अगदी गुलझार ह्यांच्या,"तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही,तेरे बिना जिंदगी भी लेकिन जिंदगी तो नही" ह्या ओळींसारखे!



          फिरुन कातरवेळ येता पापणी ओलावते

          फिरुन कातरवेळ येता पापणी ओलावते
          तू अता नाहीस जाणीव सारखी झंकारते


         दफन करुनी टाक मजला,श्वास मग घेते जरा,
          हृदय- स्पंदन बघ कसे हे सारखे मंदावते



         थांबतो का काळ कधी रे, वाट का पाहे कधी?
         सवय त्याची माणसापरी, हे न मी का जाणते?



         राहिले ना कोणतेही, त्यासवे नाते जरी
         भेट होता एक स्मित पण नेहमी साकारते



                            -मानस६



  टीप- गझल सर्वश्रुत असल्यामुळे लिंक दिलेली नाही



                             

गझल: 

प्रतिसाद

फिरुन कातरवेळ येता पापणी ओलावते
तू अता नाहीस जाणीव (जाणिव) सारखी झंकारते
 राहिले ना कोणतेही, त्यासवे नाते जरी
 भेट होता एक स्मित पण नेहमी साकारते
व्वा!
शेर २ मधला `दफन' नाही भावला, तसेच शेर ३ लयीत मार खातोय?
असो अनुवाद चांगला जमलाय.
 

धन्यवाद समीर.. दफन हा मूळ उर्दू शब्द असला तरी मराठीत बरेचदा वापरल्याजातो..
गझलेचा भावानुवाद मात्रावृत्तात असल्यामुळे कदाचित आपणास ३ रा शेर लयीत खटकला असावा..
-मानस६

गझलेचा भावानुवाद मात्रावृत्तात नसून अक्षरवृत्तातच आहे: 
गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा
असे आहे