पसारा...

प्रेमाचा हा खेळच न्यारा
रक्ताचाही उडतो पारा

म्रुत्यू काही मागत नाही
जगण्यासाठी किती पसारा

एक ओळही समजत नाही
जीवन म्हणजे गूढ उतारा

गुदमरतो हा गंध फुलांचा
देना थोडा उधार वारा

इच्छा कोठे पुर्ण जाहल्या
अनेकवेळा तुटला तारा

प्रा. श्रीधर वैद्य.

गझल: 

प्रतिसाद

एक ओळही समजत नाही
जीवन म्हणजे गूढ उतारा

वा. संकेतस्थळावर स्वागत आहे. शेवटच्या ३ द्विपदी विशेषतः आवडल्या.

एक ओळही समजत नाही
जीवन म्हणजे गूढ उतारा
वा. संकेतस्थळावर स्वागत आहे. शेवटच्या ३ द्विपदी विशेषतः आवडल्या.

भट दादांशी सहमत...
मी ही नवीनच आहे...

म्रुत्यू काही मागत नाही
जगण्यासाठी किती पसारा ........ बहोत अच्छे श्रीधरजी क्या बात है

"रक्ताचाही उडतो पारा"
छान कल्पना...
गझल पण सुन्दर...
रुपेश..

सगळेच शेर आवडले.

(मी फारसा जुना सदस्य नसलो तरी आपले स्वागत! )

सुंदर गझल! अभिनंदन!

-'बेफिकीर'!

सर्वच शेर छान जमलेत.
सुंदर गझल! अभिनंदन !

एक ओळही समजत नाही
जीवन म्हणजे गूढ उतारा

इच्छा कोठे पुर्ण जाहल्या
अनेकवेळा तुटला तारा

वा वा, सुरेख

खूपच सुंदर!!

इच्छा कोठे पुर्ण जाहल्या
अनेकवेळा तुटला तारा

वा वा सुरेख

श्रीधर छान!
पसारा,उतारा विशेष!

मक्ता प्रचंड आवडला... संकेतस्थळावर स्वागत आहे.