कशासाठी कुणासाठी...
कशासाठी कुणासाठी झुरायाचे उगा आता
सुगंधाच्या पुन्हा पाठी पळायाचे उगा आता
धरायाची उन्हे हाती कुणाच्या हासण्यासाठी
कुणाला सावली देण्या जळायाचे उगा आता
अता ना तो ऋतू वेडा न वेड्या चांदण्या तैशा
नभाशी खिन्न चंद्राला बघायाचे उगा आता
मनाच्या खोल अंधारी कुणी या ओतल्या तारा
किती आभास मी वेडे जपायाचे उगा आता
पुन्हा डोळ्यातले पाणी पुन्हा ओठात थरथरणे
कशाला ते जुने गाणे म्हणायाचे उगा आता
कुणाला लागतो वैरी मनाशी दोसती माझी
सुखाने एकमेकांना छळायाचे उगा आता
.....अनंत नांदुरकर (खलिश)
गझल:
प्रतिसाद
विद्यानंद हाडके
मंगळ, 28/06/2011 - 21:25
Permalink
धरायाची उन्हे हाती कुणाच्या
धरायाची उन्हे हाती कुणाच्या हासण्यासाठी
कुणाला सावली देण्या जळायाचे उगा आता
.....क्या बात है अनंत भाऊ
..... आपका स्वागत है यहा पर
ज्ञानेश.
बुध, 29/06/2011 - 10:44
Permalink
पुन्हा डोळ्यातले पाणी पुन्हा
पुन्हा डोळ्यातले पाणी पुन्हा ओठात थरथरणे
कशाला ते जुने गाणे म्हणायाचे उगा आता
वा.. उत्तम गझल.
समूहावर स्वागत.
(शेवटच्या शेरात वरची ओळ तपासावी.)
शुभेच्छा !
बेफिकीर
शुक्र, 01/07/2011 - 00:16
Permalink
पुन्हा डोळ्यातले पाणी पुन्हा
पुन्हा डोळ्यातले पाणी पुन्हा ओठात थरथरणे
कशाला ते जुने गाणे म्हणायाचे उगा आता
वा वा, सुंदर!
धरायाची उन्हे हाती कुणाच्या हासण्यासाठी
कुणाला सावली देण्या जळायाचे उगा आता
हाही शेर सुंदर!
'वैर'??
खूप शुभेच्छा!
-'बेफिकीर'!
अनंत नांदुरकर खलिश
शनि, 02/07/2011 - 15:56
Permalink
धन्यवाद मित्रांनो - कुणाला
धन्यवाद मित्रांनो -
कुणाला लागतो वैरी, मनाशी दोसती माझी
सुखाने एकमेकांना छळायाचे उगा आता
क्रुपया, हा शेर असा वाचावा
अनंत नांदुरकर खलिश
रवि, 03/07/2011 - 11:03
Permalink
धन्यवाद मित्रांनो - क्रुपया
धन्यवाद मित्रांनो -
क्रुपया शेवटचा हा शेर असा वाचावा...
कुणाला लागतो वैरी, मनाशी दोसती माझी
सुखाने एकमेकांना छळायाचे उगा आता