हा आहे खडतर रस्ता..

सुख दु:खांनी भरलेला हा आहे खडतर रस्ता
जगण्याचा मार्ग म्हणावा की आहे अडसर रस्ता

ती एक भेट ही अपुली घडली असती का केंव्हा ?
शहरात तुझ्या अन् माझ्या नसता कुठला जर रस्ता

हा रिवाज सप्तपदीचा पाळूया आपण दोघे
मी धरीन तोलुन तुजला तू माझा सावर रस्ता

मज वचन दिले तू जेथे त्या चौकामध्ये आता
तुकडे स्वप्नांचे करतो मज दिसतो कातर रस्ता

मग सांत्वन करून माझे ते झोपी गेले सारे
जागला संगती माझ्या हा माझ्या खातर रस्ता

तू समजू नकोस मृत्यो हा जन्म कोरडा गेला
घे बघून मी जाताना होईल ओलसर रस्ता

(देउन 'गझलदीप' हाती मज लिहिते केले त्यांनी
दाविला गुरूने मजला हा इतका सुंदर रस्ता)

--शाम

गझल: 

प्रतिसाद

सुख दु:खांनी भरलेला हा आहे खडतर रस्ता
जगण्याचा मार्ग म्हणावा की आहे अडसर रस्ता
वा. खालची ओळ मस्तच.

सुख दु:खांनी भरलेला हा आहे खडतर रस्ता
जगण्याचा मार्ग म्हणावा की आहे अडसर रस्ता.......... सही मतला है शाम

ती एक भेट ही अपुली घडली असती का केंव्हा ?
शहरात तुझ्या अन् माझ्या नसता कुठला जर रस्ता...... वाह वा

तू समजू नकोस मृत्यो हा जन्म कोरडा गेला
घे बघून मी जाताना होईल ओलसर रस्ता .............. क्या बात है जिओ शामजी

चित्तदा, आणि विद्या..मनापासून धन्यवाद!!

ती एक भेट ही अपुली घडली असती का केंव्हा ?
शहरात तुझ्या अन् माझ्या नसता कुठला जर रस्ता

वा वा !

मी धरीन तोलुन तुजला तू माझा सावर रस्ता

व्वा

जागला संगती माझ्या हा माझ्या खातर रस्ता

उत्तम मिसरा

तू समजू नकोस मृत्यो हा जन्म कोरडा गेला
घे बघून मी जाताना होईल ओलसर रस्ता

क्या बात है

(देउन 'गझलदीप' हाती मज लिहिते केले त्यांनी
दाविला गुरूने मजला हा इतका सुंदर रस्ता)

त्यापेक्षा दे'ऊ'न गझलदिप हाती हे सोयीस्कर झाले असते नाही? :-)

खरच मस्त गझल!

-'बेफिकीर'!

भुषणजी ,खूप खूप आभार...!

"गझलदीप"हे...आदरणीय प्रदीप निफाडकर याचे पुस्तक आहे,
ज्यांनी मला गझल लिहायला शिकवलं,
म्हणून तो बदल नाही स्विकारला.