हळूहळू
बघ तुला तुझे छळेल लाजणे हळूहळू
ऊन ही तसे बनेल चांदणे हळूहळू
गाळतेस तू मलाच टाळतेस बोलणे
मी तरी तुझे बनेन मागणे हळूहळू
आरसा नको बघूस तू मला बघून घे
झोप ही तुझी बनेल जागणे हळूहळू
सांग ना तुझ्याविना कसा जगू कसा मरू
आस अंतरात श्वास सांडणे हळूहळू
आत्म सूख लाभता तुला कळेल नेमके
धावणे तुझे बनेल रांगणे हळूहळू
आजही खुळा वसंत मागतो तुझी अदा
तो सुधा शिकेल आसु ढाळणे हळूहळू
मयुरेश साने .. दि .१९-जून-११
गझल:
प्रतिसाद
विद्यानंद हाडके
गुरु, 23/06/2011 - 08:18
Permalink
बघ तुला तुझे छळेल लाजणे
बघ तुला तुझे छळेल लाजणे हळूहळू
ऊन ही तसे बनेल चांदणे हळूहळू ............ मस्त मतला है वाह
आरसा नको बघूस तू मला बघून घे
झोप ही तुझी बनेल जागणे हळूहळू ......... क्या बात है जी
आत्म सूख लाभता तुला कळेल नेमके
धावणे तुझे बनेल रांगणे हळूहळू............ वाह वा मयुरेश सहीच