मजकूर
विसरणेही तुझ्या लक्षात नाही
मना, सुटका तुझी इतक्यात नाही
तुझा मजकूर तर केव्हाच कळला
भलेही तो तुझ्या पत्रात नाही
जवळ येणे तुला जमलेच केव्हा?
विलगणे अन् तुझ्या हातात नाही
नको ती ओढ स्वप्नांची जराही
खरे आयुष्य हे स्वप्नात नाही
मना, तू चल, पुकारे चांदणे बघ!
तुझे कोणीच या गावात नाही
तुझीही वेगळी आहे कहाणी
हवे जे तुज, तुझ्या नशिबात नाही
तुम्ही जो पाहता तो मोकळा मी
खरा मी कैद! - पण माझ्यात नाही
- नचिकेत जोशी
गझल:
प्रतिसाद
प्रसाद लिमये
सोम, 23/05/2011 - 16:32
Permalink
तुझा मजकूर तर केव्हाच
तुझा मजकूर तर केव्हाच कळला
भलेही तो तुझ्या पत्रात नाही
जवळ येणे तुला जमलेच केव्हा?
विलगणे अन् तुझ्या हातात नाही
नको ती ओढ स्वप्नांची जराही
खरे आयुष्य हे स्वप्नात नाही
हे तीन खूप आवडले
विजय दि. पाटील
सोम, 23/05/2011 - 16:33
Permalink
शेवटचा शेर खूप आवडला!!
शेवटचा शेर खूप आवडला!!
बेफिकीर
सोम, 23/05/2011 - 23:33
Permalink
सहमत दोघांशीही! सुरेखच गझल!
सहमत दोघांशीही! सुरेखच गझल!
supriya.jadhav7
बुध, 25/05/2011 - 12:21
Permalink
संपूर्ण गझलच आवडली....
संपूर्ण गझलच आवडली....
अमित वाघ
बुध, 25/05/2011 - 15:25
Permalink
जवळ येणे तुला जमलेच
जवळ येणे तुला जमलेच केव्हा?
विलगणेही तुझ्या हातात नाही
असे कसे वाटते....?
छान गझल...
बहर
बुध, 25/05/2011 - 18:23
Permalink
सहावा शेर सोडून सर्व आवडले..
सहावा शेर सोडून सर्व आवडले.. सहावा आवडला नाही असे नाही...पण आनंदयात्री कडून थोडी वेगळी ट्रीटमेंट अपेक्षित होती..
आनंदयात्री
बुध, 25/05/2011 - 22:21
Permalink
प्रसाद, विजय, बेफिकीर,
प्रसाद, विजय, बेफिकीर, सुप्रिया, अमित, बहर - आभार! :)
अमित - आपण सुचवलेलेही मीटरमध्येच आहे. पण विलगणे अन् आणि विलगणेही मध्ये अर्थछटा वेगळी आहे. मला विलगणे अन् अधिक भावले.
बहर, आनंदयात्री कडून थोडी वेगळी ट्रीटमेंट अपेक्षित होती.. >> हे वाचून पाय जsssरा हवेत गेले.. आपल्या लिखाणाबद्दलही अपेक्षा करण्याइतकं आपण लिहितोय असं काहीसं वाटलं.. :D :D
Btw, तुमच्याशी पूर्ण सहमत. उला मिसरा खूप सहज आला आहे, त्यामानाने सानी मिसरा punchy वाटत नाहीए...
(अर्थात ही कबुली तुमच्या-माझ्यातच!! :P)
विद्यानंद हाडके
सोम, 06/06/2011 - 18:04
Permalink
तुझा मजकूर तर केव्हाच
तुझा मजकूर तर केव्हाच कळला
भलेही तो तुझ्या पत्रात नाही
... मस्त है नचीकेत वाह
चित्तरंजन भट
बुध, 08/06/2011 - 16:54
Permalink
जवळ येणे तुला जमलेच
जवळ येणे तुला जमलेच केव्हा?
विलगणे अन् तुझ्या हातात नाही
वा. शेवटचा शेरही आवडली. एकंदर छान गझल आहे.
शाम
रवि, 19/06/2011 - 09:57
Permalink
विसरणेही तुझ्या लक्षात
विसरणेही तुझ्या लक्षात नाही
मना, सुटका तुझी इतक्यात नाही....छान मतला
गझलही छान ..वाह वा!
गौरव खुरसाले
मंगळ, 19/07/2011 - 14:28
Permalink
जवळ येणे तुला जमलेच
जवळ येणे तुला जमलेच केव्हा?
विलगणे अन् तुझ्या हातात नाही
आनंदयात्री
बुध, 10/08/2011 - 20:03
Permalink
सर्वांचे आभार! :)
सर्वांचे आभार! :)
sindhuraj
गुरु, 11/08/2011 - 03:10
Permalink
तुम्ही जो पाहता तो मोकळा
तुम्ही जो पाहता तो मोकळा मी
खरा मी कैद! - पण माझ्यात नाही....
हा शेर मला जास्त भावला.........तुमची गझल छान आहे .....
गंगाधर मुटे
शनि, 27/08/2011 - 07:12
Permalink
तुम्ही जो पाहता तो मोकळा
तुम्ही जो पाहता तो मोकळा मी
खरा मी कैद! - पण माझ्यात नाही
आवडला.