अस्पर्श स्वप्ने

बोललो होतो जरी.... विसरून पाहू
भेटलो... इतके तरी अठवून पाहू

ठेवली आहेत जी अस्पर्श स्वप्ने
ती घडी केव्हातरी मोडून पाहू

मीच लिहिलेला ‘खरा’ इतिहास आहे
कोणत्या रंगामधे बुडवून पाहू ?

मोगरा, चाफा, जुई, गाणी कळ्यांची
वेगळे काहीतरी याहून पाहू

वास्तवाला हात लावूही नको... चल,
रेघ स्वप्नाची जरा आखून पाहू

बोलताना संपला रस्ता अचानक
कोणत्या स्वप्नासवे परतून पाहू ?

गझल: 

प्रतिसाद

वा वा

अस्पर्श स्वप्ने आणि स्वप्नाची रेघ हे दोन्ही सुरेख

"इतिहास" पण मस्त

सध्या ज्या रंगाचा जोर असेल त्याचा अंदाज घ्या आणि बुडवा.. एकदम खराखुरा वाटेल ;)

बोलताना संपला रस्ता अचानक
कोणत्या स्वप्नासवे परतून पाहू ?

प्रसाद, क्या बात है यार बहोत सही व्वा!!!