भिंती !!

उरल्यात चार भिंती...
खचल्यात पार भिंती !!
.
परजून आठवांना....
करतात वार भिंती !!

आकांत ऐकुनीही...
बहि-याच ठार भिंती !!

गाठून एकटीला...
छळतात फ़ार भिंती !!

सोसून पावसाळे...
पडती न 'गार' भिंती !!

पाहून आसवांना...
द्रवती न ’यार’ भिंती !!

ओसाडश्या घराला....
ठरतात भार भिंती !!

-सुप्रिया (जोशी) जाधव.

गझल: 

प्रतिसाद

ये हुई ना बात!

उरल्यात चार भिंती...
खचल्यात पार भिंती !!..सुरेख मतला

परजून आठवांना....
करतात वार भिंती !!

आकांत ऐकुनीही...
बहि-याच ठार भिंती !!

गाठून एकटीला...
छळतात फ़ार भिंती !!....अप्रतिम

शेवटच्या २ द्विपदी अजून दमदार करता येतील.

लहान बहरीत स्वच्छ गझल झाली आहे. आवडली.

शामजी...
'बहर'जी...
मनःपूर्वक धन्यवाद !!!

-सुप्रिया.

क्षमा असावी....बेफिकीरजी....
मनःपूर्वक धन्यवाद!!!

उत्तम गझल झाली आहे.

उरल्यात चार भिंती...
खचल्यात पार भिंती !!

आकांत ऐकुनीही...
बहि-याच ठार भिंती !!

गाठून एकटीला...
छळतात फ़ार भिंती !

हे चांगले शेर आहेत.
(विरामचिन्हांचा अनावश्यक वापर टाळावा, हा एके काळी मला मिळालेला सल्ला तुमच्याकडे फॉरवर्ड करतो आहे!)

ज्ञानेशजी आपला बहुमूल्य सल्ला नक्कीच लक्षात राहील माझ्या...
गझल धन्य झाली,
-सुप्रिया.

मतला व गाठून एकटीला हे दोन....आवडले.
छान.

धन्यवाद.

ओसाडश्या घराला....
ठरतात भार भिंती

हासिले गझल.... प्रत्येक शेर आफाट.... छान... टुमदार गझल

आपली गझल आवडली. शुभेच्छा...!

मतला सुरेख.
एकटीला,घराला. . . . चांगले शेर.
गझल आवडली.

छान गझल.. लहान बहर मधे लिहिणं सोपं नसतं.. उत्तम. :)

मनःपुर्वक धन्यवाद!!!

-सुप्रिया.