नवा घाव
जरा साकळू दे, नवा घाव आहे
पुढे वेदनेचा,नवा गाव आहे
अता घे भरूनी, इथे श्वास ताजा
विहरण्यास तेथे,कुठे वाव आहे
कशी घातली तू, बळेची शपथ ती
तरी हे तुझे येथ, घुमजाव आहे
कसा बापडा रंक, झोपे भुकेला
इथे ढेकरातच,कुणी राव आहे
कसे नित्य येथे, उलटतीच फासे
कळेना कसा हा, तुझा डाव आहे
कधी मोकळे श्वास, घेशील का तू?
तुझ्याच परिघांती, तुझी धाव आहे
कुठे पंख पसरू, मला सांग येथे
पुरेशा नभाची, मला हाव आहे
फोन.....9821273412
गझल:
प्रतिसाद
कैलास
शुक्र, 22/04/2011 - 17:24
Permalink
आपली गझल वाचून संगीता जोशी
आपली गझल वाचून संगीता जोशी यांची ही गझल आठवली.
जमीन वेगळी आहे,पण नवा जुना घाव आणि जखमांचे साकळणे आले,की ही गझल आठवतेच. :)
हारण्यास एक नवा, डाव पाहिजे
साकळे जुना,नवीन घाव पाहिजे……
फत्तरास ही फुटू शकेल पालवी
आसवात तेव्हढा प्रभाव पाहिजे……..
अंध:कार संपणार आज ना उद्या
फक्त एक ज्योतीचा उठाव पाहिजे…..
दु:ख हेच एकमेव सत्य जीवनी
त्यातही हसायचा सराव पाहिजे……
--संगीता जोशी
आपल्या गझलेतील या शेरात दुसर्या मिसर्यात लय बिघडल्याचे जाणवते.
कधी मोकळे श्वास, घेशील का तू?
तुझ्याच परिघांती, तुझी धाव आहे
हा शेर आवडला.......
अता घे भरूनी, इथे श्वास ताजा
विहरण्यास तेथे,कुठे वाव आहे
संतोष कसवणकर
शनि, 23/04/2011 - 17:28
Permalink
कैलासजी, नमस्कार! आपल्या
कैलासजी, नमस्कार!
आपल्या अभिप्रायाबद्द्ल आभार!
ही गझल वाचून संगीता जोशी यांची गझल आठवावी, ही देखील आमच्या सारख्यांना फार मोठी पावती आहे.
आपल्या सुचनेबाबत धन्यवाद!
संतोष कसवणकर
शनि, 23/04/2011 - 17:28
Permalink
कैलासजी, नमस्कार! आपल्या
कैलासजी, नमस्कार!
आपल्या अभिप्रायाबद्द्ल आभार!
ही गझल वाचून संगीता जोशी यांची गझल आठवावी, ही देखील आमच्या सारख्यांना फार मोठी पावती आहे.
आपल्या सुचनेबाबत धन्यवाद!