पुन्हा केव्हातरी बोलू...

नको मित्रा, नको आता, पुन्हा केव्हातरी बोलू
जिव्हारी लागल्या जखमा, अती झाल्यावरी बोलू

अताशा शब्दही सारे, थिटे पडतात सांगाया
जरासा अर्थ शब्दांना, नवा आल्यावरी बोलू

खुल्या रस्त्यावरी इतका, तमाशा चांगला नाही
बघूया काय आहे ते, घरी गेल्यावरी बोलू

तुझा हा चेहरा सांगे, समाधी लागली आहे
तुझ्या डोळ्यातले पेले, रिते झाल्यावरी बोलू

खुशाली एकमेकांची , विचारु एकमेकांना
जुने काही नवे काही, चला काहीतरी बोलू

व्यथा ही तिच ती आहे, कथाही तिच ती आहे
इथे एकून घेणारा, कुणी नाही तरी बोलू

गझल: 

प्रतिसाद

तुझा हा चेहरा सांगे, समाधी लागली आहे
तुझ्या डोळ्यातले पेले, रिते झाल्यावरी बोलू

वाव्वा! सुरेख फारच आवडला हा शेर.

बऱ्याच दिवसांनी तुमची गझल आली. बरे वाटले. सगळेच शेर छान झाले आहेत. ही तुमची गोळीबंद, खणखणीत गझल नेहमीप्रमाणे आवडली.

खुल्या रस्त्यावरी इतका, तमाशा चांगला नाही
बघूया काय आहे ते, घरी गेल्यावरी बोलू

तुझा हा चेहरा सांगे, समाधी लागली आहे
तुझ्या डोळ्यातले पेले, रिते झाल्यावरी बोलू

खुशाली एकमेकांची , विचारु एकमेकांना
जुने काही नवे काही, चला काहीतरी बोलू

व्यथा ही तिच ती आहे, कथाही तिच ती आहे
इथे एकून घेणारा, कुणी नाही तरी बोलू

==================

हे सर्वच शेर आवडले. चला काहीतरी बोलू ही कल्पना खूप मस्त वाटली. (अवांतर - 'तिच ती' यात पहिला 'ति' दीर्घ असायला हवा असे वाटते.) खूप साधी तरीही खूप मस्त गझल वाटली. धन्यवाद!

अताशा शब्दही सारे, थिटे पडतात सांगाया
जरासा अर्थ शब्दांना, नवा आल्यावरी बोलू

खास! चांगली गझल.

तुझा हा चेहरा सांगे, समाधी लागली आहे
तुझ्या डोळ्यातले पेले, रिते झाल्यावरी बोलू

खुशाली एकमेकांची , विचारु एकमेकांना
जुने काही नवे काही, चला काहीतरी बोलू

अताशा शब्दही सारे, थिटे पडतात सांगाया
जरासा अर्थ शब्दांना, नवा आल्यावरी बोलू

हे शेर फारच सुरेख !
रुपेश देशमुखांचे पुनरागमन झाल्याचे पाहून आनंद वाटला.

तुझा हा चेहरा सांगे, समाधी लागली आहे
तुझ्या डोळ्यातले पेले, रिते झाल्यावरी बोलू
.......... क्या ब्बात है मित्रा
.......... हासिले गझल शेर

सुंदर गझल!

खुशाली एकमेकांची , विचारु एकमेकांना
जुने काही नवे काही, चला काहीतरी बोलू
हा एकदम सिंपल, पण एकदम जास्त आवडला... :)

रुपेशजी,
गजल खूप झकास जमली आहे. कोणता एक शेर आवडला म्हणणे अवघड आहे. पु.ले.शु.

फार सुंदर.. सगळे शेर आवडले.. उत्तम!

अप्रतिम गझल.

एक विद्यार्थी म्हणून
मतला:
व्हातरी बोलू
ल्यावरी बोलू

मक्ता:
हीतरी बोलू
ही तरी बोलू

नको मित्रा, नको आता, पुन्हा केव्हातरी बोलू
जिव्हारी लागल्या जखमा, अती झाल्यावरी बोलू

अताशा शब्दही सारे, थिटे पडतात सांगाया
जरासा अर्थ शब्दांना, नवा आल्यावरी बोलू

तुझा हा चेहरा सांगे, समाधी लागली आहे
तुझ्या डोळ्यातले पेले, रिते झाल्यावरी बोलू

सुभान अल्लाहा...
सही.. भारी..