''वादात या कुणीही सहसा पडू नये ''

हे का घडू नये,अन ते का घडू नये?
वादात या कुणीही सहसा पडू नये

शेंदूर फासती का,आम्हास लोक हे?
हा प्रश्न दगड-धोंड्यांना का पडू नये?

उठसूठ मुख्यमंत्री दिसतात मंदिरी
का देव अंतरी,त्यांना सापडू नये?

पाषाण तो जरी ही,पाहूनि अप्सरा
छातीत निष्ठुराच्या का धडधडू नये?

हसतात सातमजली, लाखोलि वाहुनी
''कैलास''ने शिवीही,का हासडू नये?

--डॉ.कैलास गायकवाड

गझल: 

प्रतिसाद

हे का घडू नये,अन ते का घडू नये?
वादात या कुणीही सहसा पडू नये

...वाह क्या मतला है कैलासजी
... गझलही सुंदरच

मतला,
का पडू नये?, सापडू नये?
आणि
मक्ता

खास आवडलेत.

अप्रतिम.
वादात पडू नका असा सज्जड दम दिल्यावर
आम्ही पामर काय करणार?

अप्सरा, आणि मग अ‍ॅबनॉर्मल ई.सी.जी.,
तरी आम्हीच निष्ठूर.